नाशिक जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यांवरील सॉफ्टवेअरची त्वरित चौकशी व्हावी – मनसेची मागणी

26

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नाशिक(दि.18सप्टेंबर):- जिल्ह्यातील विविध टोल नाक्यांवर अधिकृत सॉफ्टवेअर ऐवजी वेगळे सॉफ्टवेअर वापरून होत असलेल्या लुटीची चौकशी करून ही लुट त्वरित थांबविणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रादेशिक व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने १५ फेब्रुवारी २०२१ पासून देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टटेग अनिवार्य केले आहे. मात्र टोल नाक्यांवरील सॉफ्टवेअर मध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला प्राप्त झाल्या आहेत.

आधीच राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अपुऱ्या सोयीसुविधांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाश्यांना ह्या लुटमारीमुळे दुहेरी त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शासनाचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. पिंपळगांव टोलनाक्यावर ‘वाहन’ या शासनाच्या अधिकृत सॉफ्टवेअर ऐवजी काही लेन मध्ये स्कायलार्क कंपनीचे वेगळे सॉफ्टवेअर वापरून शासनाचे महसूल बुडविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे अजूनही काही सॉफ्टवेअर इतर टोलनाक्यांवर वापरात असू शकतात. यावरून शासनाचे प्रचंड मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यांवर तसेच राज्यातील इतरही टोलनाक्यांवर वापरात असलेल्या सॉफ्टवेअर प्रणालीची सखोल चौकशी करून शासनाचे होत असलेले प्रचंड आर्थिक नुकसान टाळावे तसेच प्रवाश्यांची लुटमार थांबवावी अशी मागणी मनसेने केली आहे.

निवेदनावर प्रदेश सरचिटणीस अशोकभाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर, शहराध्यक्ष अंकुश पवार, ज्येष्ठ नगरसेवक सलिम (मामा) शेख, उपजिल्हाध्यक्ष संदीप किर्वे, शैलेश येलमामे, रवींद्र (नाना) विसपुते, नामदेव पाटील, तालुकाध्यक्ष शैलेश शेलार, सुनील गायधनी, विलास सांगळे, मनविसे प्र. उपाध्यक्ष संदीप भवर, शहर संघटक अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, वाहतूक जिल्हाध्यक्ष जावेद शेख, रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित गोसावी, सौरभ सोनवणे, निफाड तालुका उपाध्यक्ष केशव वाघ, मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, मनविसे निफाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे व निफाड तालुका अध्यक्ष शैलेश शेलार यांचा सह्या देऊन निवेदन दिले आहे

आपला नम्र
शैलेश नारायण शेलार
तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना निफाड