पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा – डी. टी. आंबेगावे

39

🔹प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पी आय गोविंद ओमाशे यांचा सन्मान

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विषेश प्रतिनिधी)

जिवती(दि.18सप्टेंबर):- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने तळा पोलीस ठाणे येथे नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, रायगड जिल्हा युवाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर, तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, तालुका संघटक नजीर पठाण, तालुका उपाध्यक्ष नितीन लोखंडे, तालुका सचिव संतोष जाधव व पोलीस बांधव विष्णुदास तिडके, गणेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस व पत्रकार यांच्यात समन्वय असावा, पोलीस व पत्रकार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असावेत, पोलीस व पत्रकार यांच्यात प्रेम व सौहार्दाचे नाते असावे. पत्रकार व पोलीस यांच्यामध्ये सुसंवाद असावा, जनतेच्या कल्याणार्थ पोलीस आणि पत्रकारांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेचे हित होईल असे डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले. पत्रकार जनतेचे प्रश्न सोडवतात तर पोलीस जनतेचे रक्षण करतात त्यामुळे दोन्ही घटकांनी जनतेच्या उत्कर्षासाठी काम करावे असे कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार यांनी प्रतिपादन केले. पोलीस आणि पत्रकारांनी एकमेकांना सहकार्य करावे असे रायगड जिल्हाध्यक्ष श्रीकांत नांदगावकर यांनी आपले मत व्यक्त केले.

तर तळा तालुकाध्यक्ष सुरेंद्र शेलार, उपाध्यक्ष नितीन लोखंडे आणि सचिव संतोष जाधव यांनी पोलीस बांधावानी आतापर्यंत तळा तालुक्यातील जनतेच्या समस्या न्यायपूर्ण पद्धतीने सोडवल्या तसेच कार्य यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.यावेळी पोलीस निरीक्षक गोविंद ओमाशे यांनी तळा तालुक्यातील जनतेला सुरक्षित ठेऊन त्यांच्या विविध समस्यांचे निःपक्षपाती निराकरण केले जाईल असे सांगितले. या विशेष कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पदाधिकारी आणि सभासदांनी तळा तालुका कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.