दहा मिनिटात एट्रोसिटी दाखल होणाऱ्या, बीड जिल्ह्यात ॲट्रॉसिटी पीडितेला न्यायासाठी बसावे लागते उपोषणाला-राजेश वाहुळे

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.१८ऑक्टोबंर): -अंबाजोगाई तालुक्यात कोळकानडी येथील धीमधीमे कुटुंबियांना गावातील काही सुवर्ण व्यक्तींनी हल्ला करत त्यांना जबर जखमी केले यामध्ये ॲट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल होऊन सुद्धा प्रशासनाने आत्तापर्यंत आरोपीस अटक न केल्यामुळे धिमधिमे कुटुंबाला अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली बीड जिल्ह्यामध्ये सतत होणाऱ्या ॲट्रॉसिटी हा गंभीर विषय असतांना परळी येथे अवघ्या दहा मिनिटात ॲट्रॉसिटी दाखल होते त्या अट्रोसिटी मध्ये लगेच आरोपीला अटक केली जाते व जवळपास 14 दिवसापासून संबंधित ॲट्रॉसिटी मधील आरोपी यांना जामीन मिळत नाही असेच प्रकार जिल्ह्यात काही नेत्यांच्या आशीर्वादाने घडत आहेत.

परंतु कोळकानडी येथे एट्रोसिटी दाखल होऊन पंचवीस दिवस झाले तरीसुद्धा संबंधित आरोपीला अटक होत नाही अटक होण्यासाठी फिर्यादीला उपजिल्हाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे उपोषणाला बसावे लागते यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट घडू शकत नाही संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून आज लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी लोक जनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे मराठवाडा अध्यक्ष मोहम्मद ताहेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे तालुकाध्यक्ष सोनवणे उपस्थित होत

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED