झोतवाडे येथे स्वखर्चाने बसविले 40 एलईडी लाईट- माजी ग्रा.प सरपंच बापू तुळशीराम सदाराव यांचा उपक्रम

32

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.19सप्टेंबर):- शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे येथे पूर्ण गावाच्या विद्युत् खांब्यावर एलईडी लाईट बसविण्यात आले आहेत. तसेच झोतवाडे गावातली शेतकरी माजी ग्रा.प.सरपंच बापू तुळशिराम सदाराव यांनी स्वखर्चातून ४० एलईडी लाईट गावात बसविण्यात आले.

झोतवाडे गावात महिन्या पासून ठीकठीकाण गल्लोगल्ली मध्ये अंधार असल्याने काही अडचणी निर्माण होत. होत्या. व म्हातारे लोक यांना अंधार मध्ये चालताना येत नाही.त्यामुळे झोतवाडे गावात 40 एलईडी लाईट बसविण्यात आले.यावेळी माजी ग्रा.प. बापू तुळशिराम सदाराव,रणजीत ठाकरे, बाळकृष्ण कोळी,नानाभाऊ मगरे, राहुल ठाकरे,प्रशांत ठाकरे,दिनेश सदाराव,पंकज सदाराव,सचिन सोलंकी,गणेश सदाराव,राजेश सदाराव विनोद सदाराव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.