धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक मा. प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

25

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.20सप्टेंबर):-रविवार रोजी धरणगाव येथील मोठा माळीवाडा माळी समाज मढी मध्ये ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक मा. प्रतिभाताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.

या जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा बँकेचे संचालक मा.संजय पवार यांनी केले.

याप्रसंगी जिल्हास्तरीय ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी लोकसंघर्ष मोर्चा, वर्किंग ग्रुप मेंबर, संयुक्त किसान मोर्चा दिल्लीच्या अध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे होते. या बैठकीला प्रमुख उपस्थिती मा.करीमभाई सालार , काँग्रेसचे प्रदेश सचिव डी. जी. पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष संजय महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, रतिलाल चौधरी, हाजी हाफिजोद्दीन मोमीन व ओबीसी समाजाचे सर्व ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.

सर्वप्रथम विचारमंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

विचार मंचावरील डी.जी. पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन, निलेश पवार, संजय महाजन, सौ.पुष्पाताई महाजन व ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ या सर्व मान्यवरांनी सर्व ओबीसी बांधवांना दि. २५ सप्टेंबर २०२१ रोजी “ओबीसी आरक्षण परिषद जळगाव ” येथे येण्याचे आवाहन व मार्गदर्शन केले.

या बैठकीचे प्रमुख अतिथी मा.करीम सालार सर यांनी ओबीसी आरक्षण परिषदेविषयी सविस्तर अशी माहिती दिली व अनमोल असे मार्गदर्शन केले. या बैठकीच्या प्रमुख अध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे यांनी देशभरात ओबीसींच्या प्रश्नावर राजकारण चांगलेच तापले आहे, महाराष्ट्रात तर ओबीसी समाजावर अन्याय झालेला आहे. आपले हक्काचे आरक्षण काढून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत स्तरावर चे आरक्षण यासंदर्भात विस्तृत चर्चा केली व मार्गदर्शन केले. उठ ओबीसी जागा हो !… क्रांती चा धागा हो !… असा संदेश व जयघोष करण्यात आला.

मा.प्रतिभाताई शिंदे यांनी धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ओबीसींना “ओबीसी आरक्षण परिषद जळगाव ” व “खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद चाळीसगाव ” या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या सर्व ओबीसी समाजबांधवांच्या नियोजन बैठकीत पी.डी.पाटील सर यांनी ओबीसी परिषद जळगाव व खान्देश स्तरीय सत्यशोधक परिषद, चाळीसगांव यासंदर्भात सर्वांना माहिती दिली राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरु केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना व सत्यशोधक समाज ही काळाची गरज यासंदर्भात चर्चा करून सर्व मान्यवरांना २६ सप्टेंबर रोजी चाळीसगाव येथील ऐतिहासीक खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या ओबीसी आरक्षण परिषद जळगाव नियोजन बैठकीला धरणगाव शहरातील व ग्रामीण भागातील सर्व ज्येष्ठ – श्रेष्ठ मान्यवर , सर्व समाजाचे सन्माननीय अध्यक्ष व पदाधिकारी , सदस्य , सामाजिक कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.डी.पाटील सर तर आभार माळी समाजाचे सचिव गोपाल माळी यांनी मानले.

या ओबीसी आरक्षण परिषदेच्या बैठकीच्या यशस्वीतेसाठी धरणगाव शहरातील सर्व ओबीसी बांधवांनी परीश्रम घेतले.