शिक्षक भारती सिंदेवाही तालुका कार्यकारिणी गठीत

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.20सप्टेंबर):- सिंदेवाही येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे यांचे उपस्थितीत ग्रामीण विकास सेवक सहकारी पतसंस्था,सिंदेवाहीच्या कार्यालयात सहविचार सभा आयोजित करण्यात आली.या सभेमध्ये शिक्षकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.याच सहविचार सभेत शिक्षक भारती सिंदेवाही तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

कार्यकारिणीत सिंदेवाही तालुका अध्यक्ष म्हणून विनय सुदामराव खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्ष विकास गणपतराव पाकेवार, कार्यवाह म्हणून राजेश बबनराव मोरे,सहकार्यवाह अजय रामाजी निकोडे, कोषाध्यक्ष संजय महादेव दुधबावरे, कार्याध्यक्ष नामदेव माधव तोंडफोडे,संघटक सहदेव शांताराम खोब्रागडे,भारत आत्राम,प्रसिद्ध प्रमुख अतुल अरविंद ठाकरे,मनोज सोमा मेश्राम, कार्यकारिणी सदस्य प्रकाश सितकुरा नर्मलवार, धनराज केशव साखरे, सचिन शामराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

कैलास मेश्राम यांची चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.संदीपान जोगी यांची कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर जिल्हा कार्यवाहपदी नियुक्ती करण्यात आली.सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना पाहुण्यांचे हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

सहविचार सभेला प्रमुख अतिथी म्हणून त्यावेळी नागपूर विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,राज्य संयुक्त कार्यवाह संजय खेडीकर,विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,जिल्हाध्यक्ष भाष्कर बावनकर,विभागीय सल्लागार रावन शेरकुरे,जिल्हा कोषाध्यक्ष रमेश दांडेकर, वारजुरकर सर,धनंजय मोगरे,स्मिता शेंडे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात आले.सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे.ती मिळवणे हा आमचा अधिकार आहे. तो आपण मिळवण्यासाठी आपण सर्वांनी आमदार कपिल पाटील यांचे नेतृत्वात एकत्र झालो पाहिजे असे सांगितले.वरीष्ठ श्रेणी पात्र कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्यांविषयी चर्चा झाली.

सहविचार सभेचे संचालन बारीकराव खोब्रागडे यांनी केले.प्रास्ताविक विनय खोब्रागडे यांनी केले.आभार कैलास सर यांनी मानले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED