परभणी लोकसभेचे खासदार मा.संजयजी जाधव यांचा भव्य सत्कार समारोह

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.20सप्टेंबर):-रोजी डाॅ. आंबेडकर नगर, गंगाखेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या वतीने
परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यासाठी पुढाकार घेणारे परभणी लोकसभेचे खासदार मा.संजयजी जाधव यांचा भव्य सत्कार समारोह आयोजित करण्यात आला होता.

हा भव्य सत्कार समारोह रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. सिध्दार्थदादा भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
याप्रसंगी रिपाइं तथा सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED