फु,ना,ते बा,ना,सुरु असलेल्या सिमेटं कॉक्रीटच्या रोडची गुण नियंत्रण विभागामार्फत तात्काळ चौकशी करण्यात यावी …..!!

27

🔸मानव विकास परिषदेची मागणी

✒️बाळासाहेब ढोले(पुसद,तालुका प्रतिनिधी)

पुसद(दि.22सप्टेंबर):-तालुक्यात फु,ना,ते बा,ना,येथे सुरू असलेले सिमेटं कॉक्रीटचे रस्ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असुन या संदर्भीय मानव विकास परिषदचे सर्व पदाधिकारी यांनी कार्यकारी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद यांना निवेदन पत्र देऊन होत असलेले सिमेटं कॉक्रीटचे रस्ते अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असुन या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा गजाचा वापर देखील केल्या जात नसुन थातुर-मातुर कासव गतीने करित आहेत,वास्तविक पहाता शासणाच्या निकषानुसार व इंस्टीमेंट नुसार होत नसुन शासणाचे नियम धाब्यावर ठेऊन लांबी-रुदीमध्ये सुद्धा दालमे काला अशा प्रकारचेच काम होत आहेत.

या सर्व बाबीशी उपअभीयंता यांच्याशी चर्चा केली असता या सुरु असलेल्या कामावर कधी शासणानी ठरवुन दिलेला जेई,कीवां शासकीय अधीकारी जातीने लक्ष देत नसुन हजर सुद्धा राहत नाही “हम करे सौ कायदा” अश्या प्रकारचा ठेकेदार मनमानी भोगंळा कारोभार करित आहे,व जनतेची आणी शासणाची देखील दिशाभुल करण्याचे काम करित आहे,अधिकारी आणी ठेकेदार व जेई,ह्यांचे संगणमत असल्यामुळे या सिमेंट कॉक्रीटच्या सुरु असलेल्या कामामध्ये कोटी आब्जो रुपयाचा भ्रष्ट्राचार चौकशी अंतीम निष्पन्न झाल्या शिवाय राहणार नाही..?

कारण बसल्या जागुनच अधिकारी कागदोपत्री घोडे नाचवित असल्याचे चित्र स्पस्ट दिसत आहेत. तसेच या सिमेंट रस्त्यावर निर्सगानी टाकलेलेच पाणी मिळाले आहे,ठेकेदारांनी तर आजिबातच पाण्याचा तर वापर केलेलाच नाही त्यामुळे हा सिमेंट कॉक्रीटचा रस्ता जास्त काळ व दिवस टिकणारच नाही यांत शंकाच नाही ,त्यामुळे मानव विकास परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यानी हि बाब लक्षात घेता, सुरु असलेले सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्याची गुणनियंत्रण विभागा मार्फत निपक्ष,व निर्भीडतेने चौकशी होणे हि काळाची गरज आहे. निवेदनात असे म्हटले आहे की या सुरू असलेल्या कामामध्ये दोषी आढळुन आल्यास तातडीने निलंबनाचे आदेश काढण्यात यावे.

आणी ठेकेदाराचे परवाना देखील रद्द करावा असे निवेदन पत्रात म्हटले आहे करीता या असेने निवेदन उप अभीयंता श्री,प्रकाशजी झळके साहेब यांना पत्र देते वेळीचे पदाधिकारी,मानव विकास परिषदचे प्रदेश अध्यक्ष बळवंत मनवर, शेख,सलीम,जिल्हाकार्यध्यक्ष,जिल्हाउपाध्यक्ष आनिल चव्हाण(पाटील)जिल्हासचिव बाळासाहेब गजभीये,भीमपॅत्थरचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब जगताप हेही उपस्थीत होते.जिल्हासदस्य महेश निखाते,तालुका अध्यक्ष मो,हमीद निरबान,तालुका सचिव कयुम चव्हाण इत्यादी उपस्थीत पदाधिकारी होते,