डाॅ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन बीड येथे महिला उद्योग परिषद कार्यक्रम संपन्न

30

✒️तलवाडा प्रतिनिधि(शेख आतिख)

तलवाडा(दि.22सप्टेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहांमध्ये आज वार बुधवार रोजी दुपारी एक वाजता आयोजित कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक दशरथ रोडे ( प्रदेश उपाध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ) , कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एडवोकेट प्रेरणा सूर्यवंशी (बीड जिल्हा अध्यक्ष पुरोगामी पत्रकार संघ), एमआयडीसीचे इंजिनीयर बारी शेख, एस. बी. आय. बँकेचे प्रशिक्षण अधिकारी प्रमोद निनावे ,राष्ट्रवादी महिला बीड जिल्हाध्यक्ष संगीता ताई तूप, सुहास सावंत (जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ), चांगदेव खिरडकर (उद्योजक) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रम वेळी आपल्या भाषणात प्रमोद निनावे म्हणाले की, एसबीआय बँकेच्या प्रशिक्षण विभागामार्फत वेगळ्या उद्योगाचे प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते.

याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी घेतला पाहिजे. त्याच बरोबर बरी म्हणाले की,उद्योग उभारणीसाठी प्लॉट दिला जातो. त्याचा उपयोग उद्योग करण्यासाठी वापरला पाहिजे. एम .आय .डी. सी. मध्ये आणि सुख सुविधा पुरवल्या जातात. त्याचाही लाभ लाभार्थ्यांना घेतला पाहिजे. त्याच बरोबर संगीताताई तूपसागर आपल्या भाषणात म्हणाल्या की ,महिला उद्योग परिषद बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे. याचा मला मनस्वी आनंद होत आहे . कोरोना काळानंतर छोटा कार्यक्रम पुरोगामी पत्रकार संघाने आयोजित केला असून मला प्रमुख पाहुणे मध्ये बोलवलं त्यांनी अनेक विषयी मार्गदर्शन केले. उद्योग कसा निर्माण केला पाहिजे. विक्री व्यवस्थापन या सर्व गोष्टीवर सविस्तर चर्चा केली. त्याचबरोबर उपाध्यक्ष दशरथ रोडे म्हणाले की, पुरोगामी पत्रकार संघाच्या माध्यमातून महिला उद्योग परिषद बीडमध्ये होत , असल्यामुळे याचा लाभ नक्कीच महिला उद्योजकांना होणार आहे.

या परिषदेच्या माध्यमातून अनेक उद्योजक निर्माण होतील अशी आशाही व्यक्त केली . कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रस्ताविकामध्ये भागवत वैद्य म्हणाले की ,बीड जिल्ह्यामध्ये प्रथमच महिला उद्योग परिषद पत्रकार संघाच्या माध्यमातून आयोजित केली आहे. या उद्योजक परिषद मध्ये अनेक महिला उद्योग निर्माण होतील .मेणबत्ती ,अगरबत्ती, पापड, लोणचं, शिल्पर चप्पल ,हळद ,मसाले अशा पद्धतीने अनेक उद्योग करण्यासारखे आहेत. अनेक उद्योग बचत गटातील महिला करतील अशी आशा भागवत वैद्य यांनी व्यक्त केली. तुळजाभवानी इंटरप्राईजेस च्या माध्यमातून महिला बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्यवस्थापन, मार्केटिंग केली जाईल. असेही यावेळी म्हणाले.या कार्यक्रमास ऋतुजा सोनवणे, सुरेखा जाधव, किस्किंदा पांचाळ, अश्विनी सांगळे, प्रतिक्षा मॅडम आदीसह मोठ्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते .महिला उद्योग परिषदेची प्रशासन आणि शासन दखल घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन भागवत वैद्य यांनी मानले.