सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी

75

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधि)

गंगाखेड(दि.23सप्टेंबर):-भाव कमी करणाऱ्यांची चौकशी करत सोयाबीनला दहा हजार भाव द्या- आशी मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली असून गेल्या पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनचा दहा हजार प्रतिक्विंटल भाव होता. तो भाव कमी करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्याची चौकशी करत आजही नव्या सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

गुरुवारी परभणी जिल्हाधिकारी यांना गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की पंधरा दिवसापूर्वी सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता .चांगला भाव येणार आहे अशी अपेक्षा ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीनला आगाऊ फवारणी व खतांचे डोस दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला. अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात पिके गेली असून सोयाबीन भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नसल्याचे चित्र आहे.

सोयाबीनचे भाव कमी करण्याचा हा खूप मोठा देशस्तरावर चा घोटाळा असून या घोटाळ्यातील संबंधितांची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी मात्र भाव पडल्यामुळे हताश झाला असून कमी झालेल्या भावाने काढणीचा खर्च निघणार नाही अशी अवस्था आहे. या निवेदनावर परभणी लोकसभेचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर, प्रदेशाध्यक्ष शिवाजी महाराज बोबडे, ऊबरवाडी चे सरपंच धारबा हाके ,भाजपाचे सय्यद मुदस्सीर, आरबुजवाडीचे रमेश मुंडे उपस्थित होते.