भाजपा तालुका अध्यक्ष रामकिशन पालनवार यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

नांदेड(दि.२३सप्टेंबर):- नायगाव तालुक्याचे भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामकिशन पालनवार यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला.नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची इन्कमिंग मोहीम जोरात सुरू असून शेकडो मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेशानंतर अनेक मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. अति वंचित असलेल्या घीसाडी समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांच्या नेतृत्वात नुकताच कार्यकर्ता मेळावा घेऊन प्रवेश केला होता.

त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव तालुक्यातील तेली समाजाचे नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामकिशन पालनवार त्यांनी आज वंचित बहुजन आघाडी
मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.अनेक वर्ष प्रस्थापित भाजपात काम केल्यानंतर आपल्याला व आपल्या समाजाला न्याय मिळणार नाही हे निश्चित झाल्यानंतर आपण पक्ष बदलून बहुजनांचे श्रद्धेय नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित विचारांची कास धरून आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करत असल्याचे रामकिशन पालनवर यांनी प्रवेशावेळी प्रतिपादन केले. आगामी काळात वंचित बहुजन यांच्या न्याय हक्कासाठी आपण वंचित बहुजन आघाडी पक्षाचा घटक म्हणून जोमाने काम करू.

वंचितांची ताकत नायगाव सारख्या प्रस्थापित राजकीय प्रस्थ असलेल्या तालुक्यात वाढऊ असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांच्या कार्यालयात आज त्यांनी प्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, महासचिव शाम कांबळे दक्षिणचे तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, बिलोलीचे तालुकाध्यक्ष धम्मदीप गावंडे, महासचिव गजानन चींतले, कंधार तालुक्याचे अध्यक्ष संतोष पाटील गवारे, महासचिव बंटी गायकवाड, तालुका अध्यक्ष सतीश अनेराव.यांच्यासह सुभाष भाऊ बनसोडे, दत्ता भाऊ शेटे, प्रवीण चव्हाण, सदाभाऊ धुतमल आदींची यावेळी उपस्थिती होती

नांदेड, महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED