सुवर्णमहोत्सवी शाळेत ” सत्यशोधक दिवस ” उत्साहात साजरा…

28

✒️ धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.२४सप्टेंबर):-२०२१ शुक्रवार रोजी सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे सत्यशोधक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस.एन.कोळी यांनी केले.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पी.आर.सोनवणे, ज्येष्ठ शिक्षिका एम.के.कापडणे, पर्यवेक्षक जे.एस.पवार यांच्या शुभहस्ते बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय, शिक्षण क्रांतीचे जनक – राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

२४ सप्टेंबर, १६६४ रोजी छत्रपती शिवरायांनी शाक्त पद्धतीने दुसरा शिवराज्यभिषेक केला. तसेच शिवरायांचे विचार घेऊन राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या दोन्ही महापुरुषांना त्यांच्या कार्याला वंदन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे कनिष्ठ लिपिक प्रमोद बडगुजर यांचा जन्मदिवस शाळेतील मुख्याध्यापक व स्टॉफ च्या वतीने पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन साजरा करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी व सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.