अर्हेर – नवरगाव रहिवासी एम. ए. इतिहास मध्ये मंगेश परसराम जराते गोल्ड मेड्यालिस्ट

133

🔸नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय ब्रम्हपुरीतील विद्यार्थी

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.25सप्टेंबर):-गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत शैक्षणिक सत्र 2020-2021 मध्ये विविध परीक्षा घेण्यात आलेल्या असून सर्व अभ्यासक्रमाची विद्याशाखा निहाय सर्वाधिक CGPA /Grade/गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे गुणानुक्रमांका नुसार व गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीच्या अध्यादेश क. 61/2017 नुसार या अधिसुचने द्वारे घोषित करण्यात आले.

यात,एम. ए. इतिहास 2020-21 मध्ये नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मंगेश परसराम जराते मु.पो. अ-हेरनवरगाव ता. ब्रम्हपुरी गोंडवाना विद्यापिठात पहिला आला. मिळालेले मार्क( Gold medal) 775 (Out of 800)CGPA 9.69 मंगेश नी मिळवलेल्या गोल्ड मेड्यालिस्ट मुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इतिहास विभागाच्या वतीने व महाविद्यालय तर्फे मंगेश चे खूप अभिनंदन केल्या जात आहे.मंगेशचे आई – वडील, मित्र मंडळी व गावकऱ्यांकडून कौतुकास्पद अभिनंदन देऊन त्याच्या पुढील वाटेला शुभेच्या दिल्या जात आहेत.