उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी – श्री संदीप भस्के यांनी केली ई-पिक पाहणी

🔹ई पिक मोबाईल ॲपद्वारे आपले शेतातील सर्व पिकांच्या नोंदी करण्याचे उपविभागातील शेतकऱ्यांना केले आवाहन

🔸सातबारा उताऱ्यावर होणार आता अचुक पिकांची नोंद

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.26सप्टेंबर):- ग्रामीण भागात गावपातळीवर जमीनीचे महसुली लेखे ठेवण्याकरीता विवीध गावनमुने आहेत त्यामधील गाव – नमुना नं. 7 हा अधिकार अभिलेख विषयक असुन गाव नमुना 12 हा पिकांची नोंदवही ठेवण्यासंदर्भात आहे. गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी या संबंधीत तलाठी यांनी घ्यावयाच्या असतात. अनेक वर्षापासून सातबारा उताऱ्यावर पिकाच्या नोंदी अद्यावत होत नाहीत या पार्श्वभुमीवर भुमी अभिलेख विभागाने ई पिंक पाहणी हे ॲप विकसीत केले आहे.

गावपातळीवरून पिकपेरणी अहवालाची खरी व वास्तववादी माहिती संकलीत करतांना पारदर्शकता आणने पिक अहवालात शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग घेणे कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचुक भरपाई व योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे या हेतुने पिंक पैरणी बाबतची माहिती ई पिक पाहणी मोबाईल ॲपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे.

आतापर्यंत ब्रम्हपुरी तालुक्यात एकूण 36135 खातेदारांपैकी 18101 खातेदारांनी तर नागभीड तालुक्यात एकुण 24780 खातेदारापैकी 14028 खातेदारांनी या ई पिक पाहणी मोबाईल ॲप वर नोंदणी करण्यात आली आहेत. ई-पिक पाहणी करण्याची अंतीम मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत असून ब्रम्हपुरी उपविभागातील सर्व शेतकऱ्यांनी आपापले पिकांच्या नोंदी ई पिक पाहणी या मोबाईल ॲप द्वारे मुदतीत पुर्ण करण्यात याव्या असे आवाहन उपविभागीय अधिकारी ब्रम्हपुरी श्री संदीप भस्के यांनी उपविभागातील जनतेस केलेले आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED