मेगा फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजन

29

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी विशेष प्रतिनिधी)

उमरखेड(दि.26 सप्टेंबर):;- पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती निमित्त नेहरू युवा केंद्र यवतमाळ ब्लॉक उमरखेड अंतर्गत मेगा फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 आयोजन केले होते.अमृत महोत्सव निम्मित आपले शरीर सुदृढ आणि सक्षम असावे यासाठी सर्वांनी नियमित व्यायाम करने गरजेचे आहे सोबतच सर्वांनी रोज व्यायाम करून शरीर फिट ठेवणायची शपथ घेतली मेगा फिट इंडिया फ्रीडम रन 2.0 दिनांक 25 सप्टेंबर रोजी गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय मैदान येथे आयोजित केली होती यावेळी तालुक्यातील युवकांनी चांगला प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकार श्री.इंगळे सर राज्यशास्त्र विभाग प्रमुख गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड यांनी विद्यार्थाना शरीर चांगले सुदृढ ठेवण्यासाठी संदेश दिला या स्पर्धेत प्रथम क्रमांक आकाश कणवाळे, मो.मुजमिल,यांचा द्वितीय क्रमांक तसेच संदीप जाधव यांचा तिसरा क्रमांक आला त्यांना ट्रॉफी देऊन संन्मानीत करण्यात आले यावेळी गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड येथिल श्री.तायडे सर,शकील सर,पाचकूडके सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सारंग मेश्राम जिल्हा युवा कार्यक्रम अधिकारी व नेहरू युवा केंद्राचे अनिल ढेंगे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पियुष भारती राजु गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम संपन्न झाला.