ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ मदत करा

🔸युवा शक्ती अहिल्या सेना मराठवाडा कार्याध्यक्ष तथा पत्रकार गणेश ढाकणे यांची मागणी

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)

गेवराई(दि.27सप्टेंबर):-महिनाभरापासून पासून सातत्‍याने बीड जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे हाता तोंडाशी आलेली पिके पूर्ण पाण्यात गेले आहेत, मध्यंतरी पाऊस नसल्यामुळे तर पीक गेली होते त्यातुन वाचलेली थोडेफार आलेल्या पिकांचे आज जास्त पावसाने खूप नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या गुरा ढोरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले शेतकर्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी अहिल्या सेना मराठवाडा कार्याध्यक्ष तथा पत्रकार गणेश ढाकणे यांनी केली आहे.

बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधारे पाझर तलाव फुटुन जमीन उध्वस्त झाल्या आहेत, मागील वर्षी पिक विमा शेतकऱ्यांना मिळाला नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी पीक विमा भरला नाही, त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांच्या पिक पंचनामे करून सरसकट तात्काळ 50 हजार रुपयांची मदत आठ दिवसांत करण्यात यावी आशी मागणी अहिल्या सेना मराठवाडा कार्याध्यक्ष तथा पत्रकार गणेश ढाकणे यांनी केली आहे

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED