खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद म्हणजे आधुनिक इतिहासाचे सोनेरी पान – बाळासाहेब कर्डक

27

🔹या ऐतिहासिक परिषदेचे धरणगावातील सत्यशोधक साक्षीदार !….

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील)

धरणगांव(दि.27सप्टेंबर):- चाळीसगांव येथे दि.२६ सप्टेंबर, २०२१ रोजी १४८ व्या सत्यशोधक समाज वर्धापन दिनानिमित्त खान्देशस्तरीय सत्यशोधक परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदर सत्यशोधक परिषद दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात सत्यशोधक समाजाच्या रीतिरिवाज प्रमाणे खंडेरायाची तळी भरून करण्यात आली. सर्व विचार मंचावरील मान्यवरांच्या हस्ते क्रांतीची मशाल पेटवुन दीपप्रज्वलन करण्यात आले.पहिल्या सत्राचे उद्घाटनप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे म्हणाल्या की आजची ही परिषद देशात होणाऱ्या क्रांतीची मुहुर्तमेढ झाली आहे.पहिल्या सत्राचे अध्यक्षता करतांना विश्वासराव पाटील – गावरान जागल्या सेना, यांनी शेतकऱ्यांना वजा उत्पन्न दाखला प्रश्न सोडविला आहे तसेच, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. घाटविसावे यांनी नवीन कृषि विधेयक शेतकऱ्यांचे नुकसान केल्याशिवाय राहणार नाही असे मत मांडले.

यासाठी सत्यशोधक पध्दतीने लढा हाच एकमात्र उपाय आहे. सदर परिषदेत दोन ज्वलंत व राष्ट्रव्यापी विषयांवर चर्चा करण्यात आली ते म्हणजे कृषी विधेयक आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हिताचे की अहिताचे ? तसेच दुसऱ्या सत्राच्या उद्घाटन प्रसंगी मा. बाळासाहेब कर्डक म्हणाले की, ही परिषद आधुनिक इतिहासाचे सोनेरी पान बनेल. तसेच, वक्ते म्हणून डॉ. प्रशांत बोबडे सर यांनी नवे शैक्षणिक धोरण समजावून सांगितले. अध्यक्षता करतांना डॉ. प्रभाकर गायकवाड यांनी सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरण हे बहुजनांच्या भविष्याचा जाहीरनामा आहे. यासाठी फुले – शाहू – आंबेडकर यांनी स्थापित केलेले शैक्षणिक धोरण राबविल्याशिवाय पर्याय नाही.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ लोखंडे हजर होते. सदर कार्यक्रमाला डॉ. देवीदास शेंडे, बापूराव पवार गुरुजी, रामचंद्र जाधव, अशोकराव खलाणे, दर्शनाताई पवार, धर्मभूषण नाना बागूल, डॉ.अशोकराव गोरे, ईश्वरभाऊ माळी, किशनराव जोर्वेकर, प्रा. संतोष विरकर आदी मान्यवरांची विशेष उपस्थित होती.सदर परिषदेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आणि विशेष करून खान्देशाच्या चारही जिल्ह्यातुन सर्व जाती धर्माचे सत्यशोधक बांधव बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सत्यशोधक सुनील देवरे (रायगड) यांनी केले. पहिल्या सत्राची कार्यक्रमाची प्रस्तावना सत्यशोधक अरविंद खैरनार (औरंगाबाद) व दुसऱ्या सत्राचे प्रास्ताविक प्रा. गौतम निकम यांनी केली. सदर कार्यक्रमात सत्यशोधक संस्कृती संपूर्ण महाराष्ट्रात रुजविण्या संदर्भात एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी आयोजन समिती अध्यक्ष नानासो भीमराव खलाणे व कार्याद्यक्ष प्रा. गौतम निकम तसेच पूर्णकालीन प्रचारक म्हणून सत्यशोधक सुरेश झाल्टे, भगवान रोकडे, कैलास जाधव, सच्चिदानंद जाधव, आबा पहेलवान, सुदर्शन जाधव, राजकिशोर तायडे, आर्किटेक्ट नरेंद्र जाधव, आबा पगारे, आबासाहेब जेजूरकर व अरविंद खैरनार आणि संपूर्ण खान्देश स्तरातील सत्यशोधक बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

धरणगाव शहरातील सत्यशोधक या ऐतिहासिक परिषदेचे साक्षीदार झाले. यामध्ये आबासाहेब राजेंद्र वाघ – ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य, लक्ष्मण पाटील सर – जिल्हाध्यक्ष छत्रपती क्रांती सेना, हेमंत माळी सर – बामसेफ जिल्हा महासचिव, बामसेफ चे तालुकाध्यक्ष – पी.डी.पाटील सर, किशोर पवार सर- बामसेफ उपाध्यक्ष, सतीश शिंदे संपादक महाराष्ट्र न्युज – प्रोटान कार्याध्यक्ष, गौतम गजरे – भारत मुक्ती मोर्चा तालुकाध्यक्ष, गोरख देशमुख – राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष, तसेच बहुजन क्रांती मोर्चा, धरणगांव चे सर्व सन्माननीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद घेतला.