स्मृतीशेष परमानंद नंदेश्वर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.28सप्टेंबर):-दी बुध्दिस्ट एम्प्लॉईज अँड नान एम्प्लॉईज सोशल असोसिएशन व यशस्वी बुध्दिस्ट बचत गट ब्रम्हपुरीचे संस्थापक अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते, निर्भिड पत्रकार, उत्तम वक्ता, कुशल अध्यापक दिवंगत परमानंद नंदेश्वर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमीत्य २७सप्टेंबर ला श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

दी बुध्दिस्ट एम्प्लॉईज अँड नान एम्प्लॉईज सोशल असोसिएशन व यशस्वी बुध्दिस्ट बचत गट ब्रम्हपुरीचे वतीने तालुक्यातील व शहरातील संघटनेचे व गटाचे पदाधिकारी व सभासद व नागरीकांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. संघटनेचे सल्लागार,जेष्ठ नागरिक ईश्वर जनबंधू यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष देवानंद
मेश्राम, सचिव भिमराव ठवरे, कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे, सल्लागार खेमचंद नंदेश्वर,शांताराम भैसारे, गौतम जनबंधू, प्रा. गिरीधर बारसागडे, मंगेश नंदेश्वर, भाष्कर साहारे,
एकनाथ दोनाडकर, शंभरकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार सतिश डांगे यांनी केले.