नायगाव प्रहार संघटनेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी दिले उपोषणाचे व आंदोलनाचे निवेदन

28

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.28सप्टेंबर):-नायगाव. तालुक्यातील दिव्यांग बांधवांचा अंत्योदय योजनेत समावेश करुन त्यांना स्वतंत्र पिवळ्या रंगाचे राषण कार्ड देण्यात यावे या मागणीसाठी तहसीलदार वगवाड साहेब यांना, तर स्थानिक स्वराज्य संस्थांचा 5 % निधी दिव्यांगांच्या खात्यात त्वरित वर्ग करावा यासाठी नायगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री फांजेवाड यांना देण्यात आले.

दिव्यांगांच्या वरील मागण्या त्वरित मान्य नाही झाल्यास दिनांक 10/10/2021 रोजी सोमवारी सकाळी 11:00 उपोषण व आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.यावेळी साईनाथ बोईनवाड, मारोती मंगरूळे, मिलिंद कागडे,गोपीनाथ मुंडे, चांदू आंबटवाड, रामदास भाकरे, एकनाथ संत्रे व गायकवाड शेळगावकर हजर होते..