ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे आवश्यक -राजेश पवार

144

✒️विशेष प्रतिनिधी(शिवानंद पांचाळ नायगांवकर)

नांदेड(दि.२८सप्टेंबर):-आपले वडील कै संभाजी लक्ष्मणराव पवार यांच्या पाऊल खुणांनवर चालत आमदार श्री राजेश पवार यांनी सर्वसमावेशक समाजकारण करत नेहमीच आपले द्रातृत्व वेळोवेळी सिद्ध केले आहे.रुग्णसेवेसाठी नेहमीच तत्पर राहून सेवावृत्तीतून गोरगरीब जनतेला मग ती कोणत्याही समाजाची असो वेळीच शासकीय मदतीसोबतच वेळप्रसंगी स्वतः वैयक्तिक आर्थिक भार उचलत रुग्णांनच्या कुटुंबाला आधार देतात. मागच्या काळात झालेल्या लग्न सराईत मुस्लिम ,भोई व इतर समाजातील अनेक मुलींच्या पाठीमागे खंबीरपणे पालकाच्या भूमिकेत राहुन कुटुंबाला लग्नासाठी आर्थिक मदत केली,कन्यादान केले.आपण ज्या समाजात जन्मलो त्यासाठी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेचे मूर्तिमंत उदाहरण मा आमदार राजेशजी पवार यांनी समाजापुढे ठेवले.

आज मराठा सेवा संघ नांदेड अंतर्गत विद्यार्थी दत्तक कक्षाच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश पवार साहेब यांनी नवा मोंढा येथे होणाऱ्या शंभर मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केलीच आहे तर आज त्याच वसतिगृहातील ५ मुलीं दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.त्या ५ मुलीच्या जेवणाचा व शिक्षणाचा सर्व खर्च शिक्षण पूर्ण होईपर्यंत करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे .
तसेच मागील तीन वर्षांपासून मुदखेड येथील होतकरू व हुशार चि.यश कैलासराव सूर्यवंशी यांच्यावर वडीलाचे आकस्मिक निधन झाल्यामुळे पुढील शिक्षण सोडण्याची वेळ आली होती.परंतु कोणितरी ही बातमी आ.पवार यांना सांगितली त्यावेळी आ पवार यांनी हा मतदारसंघातील विद्यार्थी आहे का हा विचार न करता सदरील गुणवत्तापुर्ण मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

त्याची B.tech ची मागील दोन वर्षांची ८६७००/- प्रमाणे फिस भरत याही तिसऱ्या वर्षी ८६७००/-रु.चा धनादेश SGGS महाविद्यालयाच्या नावे दिला. सदरील विद्यार्थ्याला मराठा सेवा संघा चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री कामाजी पवार साहेब , कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सोपान मामा क्षिरसागर ,मराठा मुलांच्या वस्तीगृहाचे अध्यक्ष श्री मधुकर मामा देशमुख , संघाचे मार्गदर्शक श्री शे.रा .पाटील साहेब ,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पंडितराव कदम, जिल्हा कोषाध्यक्ष पि.के. कदम, जिल्हा उपाध्यक्ष रवी ढगे यांच्या हस्ते धनादेश सदरील विध्यार्थ्यांला त्याच्या आईच्या उपस्थित माननीय आमदार राजेश पवार साहेब यांनी सुपुर्द केला.तसेच सर्व समाजाबरोबर मराठा समाजासाठीही सेवा करण्यासाठी मी सदैव तयार आहे असे मनोगत व्यक्त केले.

माझ्या वडिलांनी कै.संभाजी पवार साहेब यांनी गरीब होतकरू गरिबी मुळे शिक्षण पूर्ण करण्यात अडचणी असणाऱ्या अनेक मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेण्याची ही परंपरा पवार कुटुंब चालूच ठेवेन असे सांगितले . ग्रामीण भागातील प्रतिभावंत मुलींना शैक्षणिक सुविधा पुरविणे काळाची गरज आहे नुकताच केंद्रीय लोक सेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आला यात चांगला निकाल दिसत असून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील मूल व मुली यशस्वी झाल्याचे दिसत आहे याच धर्तीवर लोक सेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी मुलांचे भव्य सत्कार आयोजित करून त्यांचे अनुभव सर्वांना ऐकण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे असेही मत व्यक्त केले . दरवर्षी सर्व धर्मीय ,सर्व जातीय विवाह सोहळे एकत्रितपणे साजरे करण्याचे सांगितले .त्यामुळे समाजाला हातभार लागेल तसेच अनाठायी खर्चही वाचेल आणी सामाजिक समरसता कायम राहील असे ही सांगितले . यावेळी त्यांचे मराठा सेवा संघ महाराष्ट्र च्या वतीने ग्रंथ व दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला. या त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होताना दिसत आहे.