उमेद अभियानातील साधन व्यक्तींनी समर्थपणे अन्यायाचा प्रतिकार करावा- आमदार श्र्वेताताई महाले – पाटील

28

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)

चिखली(दि. 28सप्टेंबर):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानामध्ये विविध पदावर कार्यरत महिला साधन व्यक्तींनी कोणतीही भिती न बाळगता तथा दबावात न येता संघटीत होऊन अन्यायाचा समर्थपणे प्रतिकार करावा त्यासाठी शासनस्तरावर अथवा रस्त्यावर सुद्धा संघर्ष करण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे असा धीर आमदार श्र्वेताताई महाले – पाटील यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोनती अभियानातील महिला साधन व्यक्तींना दिला.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नौनती अभियानात शासन ग्रामीण भागातील गरीब महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी बचत गटाचे माध्यमातून प्रयत्न करते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी वर्धिनी, सीआरपी, बँक सखी, एफ एल सी आर पी, सीटीसी, एम आय पी सीआरपी, कृषी सखी, पशुसखी इ. मानधनी पदावर मोठ्या प्रमाणात महिला कार्यरत आहेत. परंतु त्यांना दरमहा नियमित मानधन दिले जात नाही, देण्यात येणारे मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. बॅकसखींना बॅकेत बसण्यासाठी जागा नाही. बॅक कर्मचारी व प्रशासन यांचेकडुन महिलांना उद्धटपणाची वागणूक देणे, अभियाना व्यतिरिक्त ग्रामीण पातळीवरील इतरही सर्वेक्षण मानधन देण्याचे आश्वासनावर करून घेतले जाते.

माञ नंतर मानधन दिले जात नाही अशा प्रकारच्या अनेक तक्रारीचे निरसन करण्यासाठी चिखली तालुक्यातील अभियानात कार्यरत साधन महिलांनी आयोजित केलेल्या मेळाव्याला अध्यक्ष म्हणून आमदार श्र्वेताताई महाले – पाटील उपस्थित होते . या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून सौ सिंधुताई तायडे सभापती, पंचायत समिती, चिखली, सौ द्वारका ताई भोसले भाजपा महिला आघाडी अध्यक्षा, सौ निताताई सोळंकी भाजपा महिला किसान आघाडी अध्यक्षा, नगरसेवक नामु गुरूदासनी आणि साधन व्यक्ती उपस्थित होत्या.