उमरखेड महागाव परिसरात पावसाचे थैमान

43

🔹इसापुर धरणाच्या सर्व गेट मधून पाण्याचा विसर्ग नदिकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा

🔸उमरखेड नांदेड वाहतूक बंद

✒️अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी)8806583158

उमरखेड(दि.29सप्टेंबर):- -लगातार पावसामुळे सोयाबीनला येत आहेत अंकुर उमरखेड तालुक्यात हजारो हेक्टरवरिल पिके उध्वस्त पिकाच्या नुकसानी बरोबर उत्पादनात होऊ शकते घट .उमरखेड ,महागाव तालुक्यात लगातार मुसळधार पाऊस धो धो चालू पावसामुळे शेतात पूर्ण तयार झालेले उभे सोयाबीनचे पीक खराब होत आहे .शेतकरी पीक काढणीनंतर काढणीसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत .परंतु मौसम उघडत नाही आहे .त्यामुळे आता पीक पूर्णपणे खराब होण्याचा धोका वाढला आहे. आपल्या डोळ्यासमोर पिकाचे नुस्कान होत असल्यानचे पाहतांना शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत आहेत.

उमरखेड तालुक्यातील मुळावा मंडळातील सर्व गावात धनज आडद मोहदरी डोर्ली वानेगाव मुळावा भाबंरखेडा झाडगाव तिवरंग पिंपळदरी हातला नांदला पोफाळी पळसी या क्षेत्रात हजारो हेक्टरवर खरीप हंगामात पिकाची पेरणी झाली आहे .पहिले मान्सून मध्ये पावसाच्या अनियमितपणामुळे पिके करपली आणि त्यानंतर अन्य किडी व रोग यामुळे पिके संकटात होती .सोयाबीन कापूस ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्या क्षेत्रामध्ये सोयाबीन तथा कापसाचे पीक चांगल्या प्रकारे होते तेथे आता शेतात पिके खराब होण्याची शक्यता वाढली आहे. मागच्या एका हप्त्यात सारख्या पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन च्या शेंगा मधील दाणे खराब होत आहेत .अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा ला अकुंर येत आहेत. या प्रमाणे कापसाच्या पीकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .आता कापसाची फुल गळत आहेत आणि बोंड सडत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येईल. जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या संकटाला तोंड द्यावे लागत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गावांचा शहराचा संपर्क तुटला आहे. काही गावामध्ये घरात पाणी शिरले असुन त्याठिकाणी नागरिकांना आवश्यकतेनुसार सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. जिल्ह्यात संततधार पावसाने थैमान घातले असून खरीप हंगाम पूर्णता वाया गेला असून हाताशी आलेली पिके पावसामुळे होत्याची नव्हती झाली आहेत काठुन ठेवलेले आणि काठणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा पंचनामे न करता सरसकट नुकसानभरपाई द्यावी आशी शासनाकडून आपेक्षा शेतकऱ्यांना आहे.तरीही लोकप्रतिनिधी शासनदरबारी पाठपुरावा करावा आसी शेतकऱ्यांची मागणी आहे.
अमोल उत्तम जोगदंडे(प्रतिनिधी)8806583158