पुसद पोलिसांनी वाटमारी करणाऱ्या आरोपींना केले जेरबंद

26

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.30सप्टेंबर):-दिनांक 29 /8/ 2021रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास येथील बालाजी पतसंस्थेची अल्पबचत व किराणा दुकान चालवीत असलेल्या पीडित नामें, अक्षय महादेव डोळस राहणार मांडवा हा घराकडे जात असताना तीन माणसांनी लाल रंगाच्या कार ने येऊन जबरीने 35,000 हजार रुपये येऊन गेल्याचे महादेव तुकाराम डोळस राहणार मांडवा यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन पुसद शहर येथे अपराध क्रमांक 405 ऑब्लिक 2021भारतीय दंडविधान प्रमाणे कलम 394 गुन्हा नोंद करून तपासात घेतला घेतला.

गुन्हा घडल्यानंतर तपासाची चक्रे फिरवून घटनेच्या दिवशी गुन्ह्यात वापरलेली लाल रंगाची क्रेटा वाहन क्रमांक एम. एच. 29 बीसी/0682 किंमत अंदाजे 14 लाख रुपये वाहनाचा त्यावर खासगी चालक म्हणून नोकरी करणारा आरोपी अतीश किशोर राठोड, राहणार बोरनगर, याने व त्याचे साथीदार गोपाल शंकर कापसे,पवन बाजीराव वाळके, निलेश सुभाष थोरात, सर्व राहणारा पुसद यांच्या मदतीने सदर पीडित अक्षय डोळस, यांच्या जवळून जबरीने रोख रक्कम 35,000हजार रुपये घेऊन गेल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपी, अतिश किशोर राठोड, राहणार बोरनगर व गोपाल शंकर कापसे, राहणार विटाळा वार्ड पुसद त्याला दिनांक 29 /9 /2021रोजी रात्री 10.30 वा. अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, डॉ.दिलीप भुजबळ पाटील, मा. अप्पर पोलीस अधीक्षक, श्री .अप्पाराव धरणे, आणि पोलिस उपविभागीय अधिकारी श्री. आदित्य मिरखेलकर, मा. पुसद पोलिस निरीक्षक, दिनेश चन्द्र शुक्ला. यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे, सागर भारस्कर, दिबी प्रमुख पो. ह. वा.दिपक ताटे जलाल शेख या संपूर्ण टीमने कार्यवाही केली आहे.