अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या संशयातून मारहाण केल्याप्रकरणी तिघांना पाच वर्षे कारावास

24

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

नासिक(दि.30सप्टेंबर):- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संशयातून युवकास मारहाण केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ये एस वाघवसे यांनी तिघांना पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली डिसेंबर 20 16 मध्ये औद्योगिक वसाहती आनंद छाया बस स्टॉप भागात ही घटना घडली होती या घटनेत मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याने सातपूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अर्चना किशोर जाधव 28 संजय वसंत जाधव 34 व महेश अरुण खिरडकर 27 तिन्ही राहणार सातपूर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत सातपूर येथील आठ हजार कॉलनी परिसरात चार डिसेंबर 20 16 रोजी ही घटना घडली होती अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा संशयातून तिघांनी कुटुंबास दमदाटी करीत सुशांत गजानन बच्छाव 20 राहणार राजाचे कौळाणे तालुका मालेगाव यस बेदम मारहाण केली होती त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुशांत चा मृत्यू झाल्याने याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खून सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक जे जी गायकवाड यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल सादर केली होती या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एडवोकेट एस जी कडवे यांनी कामकाज पाहिले युक्तिवाद केला आरोपीविरोधात साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयाने सुशांत यास् केल्याप्रकरणी तिघांनाही पाच वर्षे सक्षम कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंड शिक्षा सुनावली या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार डीएस काकड पी व्ही पाटील पोलीस नाईक एस यु गोसावी आदींनी कामकाज पाहिले