खंडलाय बु येथे लम्पीस्किन आजारावर गुरांना लशिकरण

26

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

धुळे(एस.के)(दि.1ऑक्टोबर):- तालुक्यातील खंडलाय बु ता जि धुळे गावात ग्रामपंचायत मार्फत दिनांक 30/09/2021 रोजी आपल्या कृषिप्रधान देशात प्रगतशीर शेतीला जोड म्हणून खंबीरपणे रात्रं दिवस राबणारा आपला सर्जा (पाळीव प्राणी ) राज्यावर आज सर्वत्र भयंकर लांपिंग आजार पसरला आहे. त्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी, कष्टाळू सर्जा राजाच्या शारीरिक हानी व जीवित हानी होऊ नये म्हणून भव्य दिव्य असे शेतकरी / कष्टकरी बांधवांच्या पाळीव प्राण्यांना विशिष्ट अशी लंपिंग आजाराची लस टोचून देण्यात आली.

लशीकरणासाठी असंख्य पाळीव प्राणी एका जागेवर आणून सर्व गुरं ढोरांना काटेकोर पणे नोंदणी करून नंबरप्रमाणे पशुवैध्यकीय अधिकारी श्री. डॉ एम बी चौधरी (खंडलाय बु,) यांनीच सर्वस्वी मेहनत घेऊन लसीकरण पूर्ण केलं. या शिबिराचे आयोजक गटप्रमुख श्री आबा पगारे, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, समस्थ शेतकरी, आणि पाळीव प्राणीधारक ग्रामस्थ. उपस्थित होते.