आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग त्वरित बनवा अन्यथा रस्त्यावर उतरणार! – माजी जि. प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचा ईशारा

27

🔺रा.काँ.तर्फे तहसीलदार यांना निवेदन सोपविले

✒️राहुल डांगे(विशेष प्रतिनिधी)

सिरोंचा(दि.1ऑक्टोबर):- आलापल्ली ते सिरोंचा महामार्ग मागील अनेक महिन्यांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना अडचणींना मोठा सामना करावा लागत आहे., ‘रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता’ अशी अवस्था सिरोंचा मार्गाची झाल्याने दुरुस्तीसाठी आता प्रतिक्षेची सीमा संपली असून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी सिरोंचा तहसील कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत शुक्रवारी धडक दिले असून सात दिवसाच्या आत कामाला सुरुवात करा या आशयाचे निवेदन सिरोंचा येथील तहसीलदार हमीद सैय्यद यांच्या मार्फतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविले.

निवेदनात नमूद केले आहे की, सिरोंचा येथील नागरिकांना जिल्हा कार्यालय व अन्य कार्यालयीन कामकाजा करिता गडचिरोली, अहेरी येथे नेहमी ये-जा करावे लागते. आधीच सिरोंचा हे अधिक किलोमीटरचे तालुकास्थळ असून रस्त्याअभावी आता तर महत्वाच्या व कार्यालयीन कामकाजा करिता अक्षरशः तेलंगणा राज्यातून फेरफटका मारून गडचिरोलीकडे यावे लागते आहे. सिरोंचा वासीयांना व नागरिकांना मोठ्या अडचणी व समस्यांना सामोरे जावे लागत असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाली असून रस्ता दुरुस्तीसाठी आता सात दिवसाचा ‘अलटीमेटल’ दिले असून तसे न झाल्यास उपोषण व रास्ता रोको चे पावित्र्य अवलंबिनार असल्याचे ईशारा निवेदनातून दिले आहे.

तहसीलदार हमीद सैय्यद यांच्याकडे निवेदन देतांना रा.काँ.चे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कल्लूरी, सिरोंचा पंचायत समितीचे सभापती मोडेम सत्यम, उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, माजी नगरसेवक रवी रालबंडीवार आदी व असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.