✒️तलवाडा प्रतिनिधी(शेख आतिख)

तलवाडा(दि.1ऑक्टोबर):-1 ऑक्टोबर हा जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करत तलवाडा ग्रामपंचायत च्या वतीने जेष्ठ नागरिक यांच्यासाठी विरंगुळा कक्ष स्थापन करत त्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक व मास्क देऊन त्यांचे स्वागत करून सत्कार करत जेष्ठांचा सन्मान केला याकार्यक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंबादास चव्हाण हे उपस्थित होते.जेष्ठांच्या सन्मानार्थ औरंगाबाद चे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी एक अभिनव योजना आमलात आणली असून ही योजना सर्व ग्रामीण भागात राबवून जेष्ठांच्या सन्मानार्थ पाऊल उचलले आहे,सर्व ग्रामपंचायत मध्ये 1 ऑक्टोबर हा जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा करत त्यांच्यासाठी एक स्वतंत्र विरंगुळा कक्ष स्थापन करण्यात आल्या आहेत.

यामध्ये वाचन करण्यासाठी दैनिक ,साहित्य ,पुस्तक ठेवण्यात यावे असे आदेशात करण्यात आले असून याचा भाग म्हणून तलवाडा ग्रामपंचायत येथे ही योजना राबवण्यात अली यावेळी जेष्ठांचा सत्कार करून मास्क वाटप केले यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अंबादास चव्हाण ,सरपंच विष्णू हात्ते,उपसरपंच आक्रम सौदागर,ग्रामविकास अधिकारी व्ही.आर.मस्के, ग्रामपंचायत सदस्य किशोर हात्ते,डिंगबर पवार,सोमनाथ काळे,विठ्ठल चव्हाण,शहादेव साबळे, पत्रकार सुभाष शिंदे,विष्णू राठोड,सुरेश गांधले,साहेबराव कुर्हाडे,राहुल डोंगरे,सचिन नाटकर,तुळशीराम वाघमारे,गौतम आठवले यांच्यासह जेष्ठ नागरिक व गावकरी उपस्थित होते.ल

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED