निफाड तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांना मनसेचे निवेदन

29
✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)

निफाड(दि.1ऑक्टोबर):-तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम पिकाचेमोठे नुकसान झाले असून. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. तालुक्यातील काढणीला आलेल्या सोयाबीन टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा शेतात पाणी साचल्याने कांदा सडला आहे तर भुईमूग मका द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झालेले आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून एकरी 50 हजार रुपये मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन मा राज्य जलसंपदा मंत्री मा श्री जयंत पाटील साहेब यांना देण्यात आले.

यावेळी मनसे तालुका अध्यक्ष शैलेश शेलार, मनविसे तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील, पिंपळगाव शहर अध्यक्ष राजाभाऊ भवर, विधानसभा अध्यक्ष मनवीसे गिरीष कसबे, निलेश सोनवणे, मनवीसे ता उपाध्यक्ष ऋषिकेश झाम्बरे, वैभव कुशारे, यश उगले, कृष्णा राहणे, नारायण वाघ, यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते