आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आज 2 ऑक्टोबर 2021रोजी गांधी जयंती निमित्त एक दिवस सुखाचा कार्यक्रमाचे पुण्यातील पिंपरी येथे आयोजन

27

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.2ऑक्टोबर):- आंतरराष्ट्रीय जेष्ठ नागरिक दिनानिमित्त कांचन मुव्हीज पुणे तर्फे जागृत सत्कर्म फाउंडेशन पुणे अल हमद , एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी खारघर ,मुंबई व नगरसेविका उषा काळे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवीण घरडे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवस सुखाचा या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आज 2 ऑक्टोबर2021 रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त पुण्यातील पिंपरी येथील इंदू लॉन्स, एम्पायर हॉटेल शेजारी येथे 10.30 ते 5 या वेळेत करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, लायन्स क्लब चे अध्यक्ष व व्याख्याते वसंत गुजर हे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती मध्ये ज्येष्ठ अभिनेते पिंपरी-चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक मुगळीकर, पुण्याचे माजी पोलिस आयुक्त धनंजय धोपावकर, अनाथांची आई ज्येष्ठ समाजसेविका सिस्टर लुसी कुरियन , मुंबईचे माजी विक्रीकर उपायुक्त व योग गुरु रमेश चक्रे, मुंबईचे माजी विक्रीकर उपायुक्त व योग गुरु रमेश विटकर, सामाजिक कार्यकर्ते व संगीतकार सुनिल दारव्हेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात कथक नृत्य योग गायन व विविध मनोरंजनाचे कार्यक्रम व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एकटेपणातून मुक्त होण्यासाठी व सामाजिक बांधिलकी जपत प्रवीण घरडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.तरी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक प्रवीण घरडे यांनी केले आहे.कार्यक्रमाच्या माध्यमाने एकमेकांचे दुख:वाटता येईल व सुख देता येईल सदर कार्यक्रम दिवसभर असेल.कार्यक्रमात एक वेळेचे जेवन,व चहा नाष्टा असणार आहे.

या कार्यक्रमात मनोरंजन गीत गायन नृत्य खेळ,ह्यांचे नियोजन प्रत्येकाला बोलायला संधी मीऴेल व त्यांच्यातील कला गुणाला वाव देण्यात येईल.हा कार्यक्रम विशेष करुन ज्येष्ठ नागरीकासाठी आहे.कारण अनेक ज्येष्ठ नागरीक मुल मुली असुनही ते प्रेमाच्या शोधात असतात. मुल मुली,सुना त्यांना प्रेमाची वागणुक देत नाही.काहीची मुले विदेशात आहे.आईबाप मेले की जिवंत आहे.हे पण त्यांना माहीत नसते.मग ह्या मुलाचा काय उपयोग? यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन प्रवीण घरडे यांनी केले आहे.