मराठवाड्याच्या दोन विद्यार्थ्यांना रिपाई डेमोक्रॅटिक कडून परदेशात नोकरीची संधी उपलब्ध

29

✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

मुंबई(दि.2ऑक्टोबर):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील दोघांना परदेशात जहाजेवर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे याकामी पक्षप्रमुख कनिष्क कांबळे व महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी कसोसिने प्रयत्न केले.*

मराठवाड्यातील नांदेड येथील सौरव सतीश सोनावणे व समेद चौधरी या दोन विद्यार्त्यांना परदेशात समुद्रातील मोठ्या जहाजेवर काम करण्याची प्रचंड इच्छा होती, त्यांनी पक्षाचे महासचिव डॉ. राजन माकणीकर यांच्याशी सम्पर्क साधला.

पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांनी मर्चंट नेव्ही च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून जोरदार सूत्र हलवली व दुबई येथे थांबलेल्या जहाजावर डेक कडेड म्हणून नियुक्ती करवून दिली.

सौरव सोनावणे व समेद चौधरी यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबइहून दुबई साठी प्रस्थान केले यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे व राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी या दोघांना आशीर्वाद व पुष्पगुछ देऊन पुढील कार्यास सम्यक सदिच्छा व्यक्त केल्या.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षप्रमुख कनिष्क कांबळे हे उच्चशिक्षित असून डझन हुन अधिक देशात वास्तव्याचा अनुभव आहे, परदेशी त्यांचा दांडगा संपर्क आहे, परदेशात बौद्ध व आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यास रिपाई डेमोक्रॅटिकचे व्यासपीठ अत्यंत उपयोगी ठरत असल्याचे डॉ. राजन माकणीकर यांनी प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले.