🔸राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कवी राजेंद्र लाड यांच्याकडून मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांना “साहेब” या कवितेची अनमोल भेट

✒️बीड विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.5ऑगस्ट):-शिक्षक हा कधीही कामचुकारपणा करीत नाही त्याला येणाऱ्या अनेक अडचणीवर मात करून तो ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असतो पण कधीही त्याबद्दल तक्रार करत नाही असे प्रतिपादन मैत्रा फाउंडेशन मार्फत शिक्षण महर्षी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन बोलताना भगवान सोनवणे,उपशिक्षण अधिकारी,जिल्हा परिषद बीड यांनी केले.कार्यक्रमाला खटोड प्रतिष्ठानचे गौतम खटोड त्याचप्रमाणे दैनिक दिव्य लोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर,दैनिक लोकशाचे वृत्तसंपादक भागवत तावरे,महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्रीराम बहिर,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान पवार,अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटनेचे अध्यक्ष हरिदास घोगरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्य समन्वयक खेडकर राजेंद्र,प्रसिद्ध साहित्यिक भास्कर बडे तसेच शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड,भाऊसाहेब हंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मैत्रा फाउंडेशन बीड यांच्यामार्फत शिक्षण महर्षी पुरस्कार देण्याचे हे पहिलंच वर्ष होते.मैत्रा फाउंडेशनच्या उपक्रमाचे सर्व उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.महाराष्ट्र राज्य भारतातील एकूण ३३ शिक्षकांना शिक्षण महर्षी पुरस्कार तसेच समाजसेवक शिक्षक भास्कर ढवळे यांना समाजरत्न पुरस्कार याप्रसंगी प्रदान करण्यात आला.कार्यक्रमांमध्ये राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा कवी राजेंद्र लाड यांनी मैत्रा फाउंडेशन तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार व लोकप्रभा शिक्षक विचार मंच यांच्यावर लिहिलेल्या कवितेची अनमोल प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.सर्व पुरस्कार्थिना याप्रसंगी सन्मान चिन्ह,प्रमाणपत्र व एक काव्यसंग्रह देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातील पुणे,सांगली,वर्धा,उस्मानाबाद,
अहमदनगर,पालघर,मुंबई,परभणी इत्यादी ठिकाणावरून शिक्षक उपस्थित झाले होते.

याप्रसंगी संतोष मानूरकर,गौतम खटोड,भास्कर बडे,भागवत तावरे,तुकाराम जाधव,श्रीराम बहीर,राजेंद्र लाड आदी उपस्थितांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षकांची भूमिका कशापकारे मोलाची राहिली आहे आणि आपण आपल्या शिक्षकांनामुळेच आयुष्यामध्ये प्रगती करू शकलो असे प्रतिपादन केले.याप्रसंगी प्रास्ताविक करताना मैत्रा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द.ल.वारे यांनी फाउंडेशनची स्थापना ही साहित्य,कला,संस्कृती,शिक्षण व सेवा यासाठी केलेली असून फाउंडेशन मार्फत भविष्यामध्ये शालेय महाविद्यालयीन स्तरासाठी तसेच शिक्षकांसाठी व संस्कृती जपण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन तसेच स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे फाऊंडेशनचे एक उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमासाठी बीड जिल्हा परिषद चे उपशिक्षणाधिकारी भगवान सोनवणे,बीड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तुकाराम जाधव,थोर समाजसेवक गौतम खटोड,साहित्यिक भास्कर बडे,दैनिक दिव्य लोकप्रभा चे संपादक संतोष मानूरकर,दैनिक लोकाशाचे वृत्तसंपादक भागवत तावरे,शिक्षक संघटनेचे नेते श्रीराम बहिर,हरिदास घोगरे,भगवान पवार,राजेंद्र खेडकर,भाऊसाहेब भांगे,राजेंद्र लाड तसेच संस्थेचे संस्थापक हर्षा ढाकणे,उज्वला वनवे,सरिता नाईकवाडे,माधुरी कोटुळे,शितल बळे तसेच जिल्हाध्यक्ष संजय राठोड आणि पुरस्कार प्राप्त शिक्षक तसेच बहुसंख्य शिक्षक,शिक्षिका व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED