जि.प.बीड मध्ये दिव्यांग हितार्थ मा.सिईओ “झिरो पेंडन्सी अभियान” राबविणार – राजेंद्र लाड

31

🔸दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने अभियानाचे स्वागत

✒️सरस्वती लाड(आष्टी प्रतिनिधी)

आष्टी(दि.6ऑक्टोबर):-शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांच्या निवेदनाच्या आधारे दि.४ आँक्टोबर २०२१ रोजी बीड जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब यांनी जिल्हा परिषद अंतर्गत विभाग प्रमुखासमवेत संघटनेच्या बैठकीचे आयोजन केले होती.सदरील बैठकीत दिव्यांग कर्मचारी यांना उद्भवणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याकरिता यापुढे जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी कामाचा निपटारा करण्याकरिता दिव्यांग कर्मचाऱ्यांचे कामे जलद गतीने पार पाडण्याच्या हेतूने सर्व कार्यालयात झिरो पेंडन्सी अभियान तात्काळ राबविण्याचे आदेश सर्व विभाग प्रमुखांना बैठकीत देण्यात आले.

या बैठकीत दिव्यांग व्यक्तींना उद्भवणार्‍या समस्यांचे निराकरण करण्याकरिता दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य तंत्रज्ञान उपकरणे शासनाच्या आदेशान्वये विनाविलंब प्राप्त करून देणे,तसेच प्रलंबित संचिका तात्काळ निकाली काढणे,मा.दिव्यांग कल्याण आयुक्त यांच्या आदेशास अनुसरून सर्व कार्यालयाच्या दर्शनी भागावर दिव्यांग अधिनियमाचे फलक उपलब्ध करून देणे इत्यादी प्रमुख विषयाचा समावेश होता.सदर बैठकीत या सर्व विषयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी समर्पकरीत्या निराकरण करुन यापुढे दिव्यांग कर्मचाऱ्यांप्रती गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे असे विभाग प्रमुखांना सांगितले.

तसेच याच बैठकीत दिव्यांग व्यक्तींप्रती शासकीय कर्तव्याची प्रतिपूर्ती करणाऱ्या जिल्हा परिषदेतील बीड तालुका आरोग्य अधिकारी नरेश कासट,सामान्य प्रशासन विभागात सेवाविषयक प्रशासकीय सहाय्य करणारे वरिष्ठ सहाय्यक कैलास तांगडे,कनिष्ठ प्रशासनाधिकारी शिवलाल राठोड,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचे स्वीय सहाय्यक व सांख्यिकी विस्तार अधिकारी चंद्रकांत पांडव,शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी गिरीश बिजलवाड,आरोग्य सहाय्यक संजय बोंद्रे या कर्मचारी व्यक्तींचा मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.

तरी वरील सर्व सन्मानार्थी आदर्श कर्मचाऱ्यांचे दिव्यांग कर्मचारी संघटनेचा वतीने अभिनंदन करण्यात येत असून दिव्यांग कार्याप्रती बीड जि.प.चे कर्तव्यदक्ष मुख्यकार्यकारी अजित पवार साहेब यांनी झिरो पेंडन्सी अभियान राबविण्याचा जो स्तुत्य निर्णय घेवून तशा सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्याबद्दल शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी स्वागत केले असून आभारही व्यक्त केले आहेत.दिव्यांगांप्रती घेतलेल्या कोणत्याही चांगल्या निर्णयाचे नेहमीच स्वागतच केले जाईल असेही शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.