✒️धरणगाव प्रतिनिधी(पी. डी.पाटील सर)

धरणगांव(दि.6ऑक्टोबर):-धरणगाव येथील रहिवासी व पिंपळे बुद्रुक येथील उपक्रमशील शिक्षक व साहित्यिक कैलास पवार यांना अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा कुबेर पुरस्कार प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि साहित्यिक तसेच कुबेर समुहाचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक बी.एन. चौधरी, निलेश भांडारकर, रेखा पाटील यांच्या हस्ते जळगाव येथील जोशी प्लाझा सभागृहात देण्यात आला.

त्यांनी जि.प.शाळा धाबे, जि.प.शाळा दगडी सबगव्हाण ता. पारोळा, जि. प. शाळा शामखेडे तालुका धरणगाव या शाळांचा कायापालट केल्याबद्दल त्यांना आतापर्यंत 30 पुरस्कार मिळाले असून त्यात दलित साहित्य अकादमी नवी दिल्लीतर्फे आंबेडकर फेलोशिप तर जि.प.जळगाव तर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचा देखील समावेश आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाशवाणीचे निवेदिका अपूर्वा वाणी तर आभार रचना भांडारकर यांनी केले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED