✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.6ऑक्टोबर):-अखिल भारतीय कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी भाई देसाई व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष श्री विलास औताडे यांच्या सूचनेनुसार व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जी व भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेस सेवादलतर्फे आयोजित कार्यक्रमात कोरोना काळात सेवाभाव जपून जनतेच्या आरोग्य तसेच उपचारांच्या सोयी सुविधांसाठी लढणाऱ्या डॉक्टर्स, गांधी नगर उपजिल्हा रुग्णालय अधिक्षका पॉल मॉडम,पारगाव आरोग्य केंद्र अधिक्षक मुजावर , सावर्डे आरोग्य केंद्र चे सुहास माळी, गडमुडशिंगी आरोग्य केंद्र मेडिकल ऑफीसर मुल्ला मॅडम, शिरोली ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल आॉफीसर डॉक्टर जेसिका मॅडम यांचा व डॉ वेदांतिका पाटील, मेडिकल असिस्टंट गोविंदा बनसोडे, आशा वर्कर्स गट प्रमुख छाया सुतार, सहकारी सागरधनवडे,व प्रमोद कांबळे सावर्डेकर व अनेक कोरोणा योध्दा यांना सन्मानपत्र गौरव करण्यात आला.

तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या यांचाही सन्मान करण्यात आला. नर्सेस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ऍम्ब्युलन्स चालक व स्मशान घाटावरील पालिकेचे कर्मचारी तसेच सामाजिक आरोग्य अबाधित रहावे या जाणिवेतून झटणारे समाजातील इतर घटक अश्या कोल्हापूर जिल्ह्यातील “कोरोना वॉरीयर्स” चा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार चंद्रकांत जाधव अण्णा, आमदार प्रा जयंत आसगावकर, प्रदेश सरचिटणीस ॲड गुलाबराव घोरपडे, कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, कोल्हापूर शहर समन्वयक सचिन भाई प्रल्हाद चव्हाण व कोल्हापूर शहर काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा सेवादल अध्यक्ष आरके देवने , कोल्हापूर शहर जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष संजय पोवार वाईकर हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक जिल्हा प्रवक्ते श्री रंणजीतसिंह पाटील यांनी केले. या कार्यक्रमास सत्यशोधक महिला बँकेच्या अध्यक्षा व शहर महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुलोचना नायकवडी, वहिनी, शिरोळचे ज्येष्ठ बंडोपंत मनियार ,जयसिंगपूर महिला सेवादल अध्यक्ष सौ शोभा परिहार, जयसिंगपूर शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष सूर्यवंशी व विजयकुमार भोसले राज्य समन्वयक- महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग कुंभोज व सातारा जिल्हा प्रभारी ,महिला सेवादल जिल्हाध्यक्षा सौ शोभा पाटील, कोल्हापूर शहर जिल्हा महिला सेवादल अध्यक्षा सौ मंगलताई खुडे, यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिगंबर हराळे, सेवादलाचे यशवंत थोरवत, अशोक लोहार, महिला ब्लॉक अध्यक्ष सौ हेमलता माने, कोल्हापूर महानगरपालिका महिला बालकल्याण माजी सभापती सौ लीलाताई धुमाळ, उपाध्यक्षा सौ सविता रायकर, सेवा दल जिल्हा सचिव रघुनाथ पिसे, वडगाव शहर अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष विकास कांबळे, हातकलंगले तालुका सदस्य राजकुमार मिठारी, वडगाव जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत हजारे, प्रमोद कांबळे, वैभव घोरपडे, सुहास माळी व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमधील कोरोना योध्दो व कॉंग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. आभार जिल्हा सेवादल अध्यक्ष आर के देवणे यांनी मानले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED