✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.6ऑक्टोबर):- मानिकगड पहाडावरील जिवती तालुक्यातील दि. ५- १०-२०२१ रोजी पुनागुडा येथील शेतकरी लक्ष्मण तुकाराम भावे यांच्या पाच एकर शेतात कापसाच्या उभ्या पिकावर वनपाल अधिकारी आणि इतर काही अधिकार व कर्मचारी यांनी ट्रॅक्टर फिरवून शेतातील कापूस पिकाचा नुकसान केला असल्याने संबंधित अधिकारीवर कारवाई करुन तात्काळ अटक करा आणि सुधाकर जाधव नाईक नगर यांचे टॅक्टर जप्त करा असे दिनांक ६- १०-२०२१ रोजी उप पोलिस स्टेशन पाटण येथे तक्रार करण्यात आली आहे.संबधित अधिकारी बल्की यांना अटक केली नाही तर पुनागुडा गाववासी आणि दलित समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

आमच्या प्रतिनिधीने संबंधित अधिकारी बल्की यांच्याशी मोबाईल वर संपर्क करुन प्रतिक्रिया जाणून घेतली.बल्की राऊंड अधिकारी विरुर रेंज यांनी सांगितले की ती जमीन आमच्या वनविभागाची आहे आणि आम्ही वारंवार तोंडी सुचना देऊन सुध्दा देण्यात आले आणि त्या अतिक्रमण धाकाला आमच्या कार्यालयात बोलावून पण सांगितले तरी पण तो शेतकरी एकत नव्हता म्हणून आम्ही दि. ५ आॅक्टोंबर २०२१ रोजी मी आणि माझे वरिष्ठ अधिकारी इंगळे साहेब व इतर कर्मचारी हजर असताना पिकाचे अतिक्रमण हटविण्यात आले अशी माहिती संबंधित अधिकारी बल्की यांनी दिली

महाराष्ट्र, मागणी, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED