शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा

27

🔸पुरोगामी युवा ब्रिगेड चा पुढाकार

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड- (दि.6अगस्ट) शासनाने यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब आर्थिक मदत द्यावी या मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा बुधवार रोजी तहसील कार्यालयावर धडकला.अतीवृष्टी मुळे हाता तोंडासी आलेला घास गेला. सोयाबीन चे आतोनात नुकसान झाले.

राज्य शासनाने शेतकरी हीत लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच पिक विमा ताबडतोब देण्यात यावा आदी मागण्यांसाठी तालुक्यातील शेतकरी पुरोगामी युवा ब्रिगेड च्या नेतृत्वात रस्त्यावर उतरले होते.ईसापूर धरण प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे पैनगंगा नदी काठावरील गावांनमध्ये पुर आला यामुळे नदी काठावरील शेती पाण्याखाली येऊन पिकांचे आतोनात नुकसान झाले.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन ईसापुर धरण प्रशासनाच्या गलथन कारभारामुळेच शेतकऱ्यांवर ही वाईट वेळ आलेली आहे यामुळे संबंधित प्रशासकांची, अभियंत्यांची चौकशी करून त्यांच्या वर कारवाई करावी अशी मागणी देखील या मोर्च्या च्या माध्यमातून करण्यात आलीयाचबरोबर उमरखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे फार नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन कराव लागत आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्या मुळे ओला दुष्काळ जाहीर करा, पिकांचे पंचनामे न करताच शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत करा तसेच पैनगंगा नदी काठावरील गावांना पुराच्या पाण्यामुळे शेती पाण्याखाली गेलेल्या शेतकऱ्यांना देखील आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना पिका विमा ताबडतोब देण्यात यावं व त्याच बरोबर कृष्णापूर येथे टॉवर वर लटकून गळ फास घेत आत्महत्या केलेल्या अर्जुन रामचंद्र आडे या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या मुलांच्या पुढील शिक्षणासाठी व्यवस्था करावी आदी मागण्या पुरोगामी युवा ब्रिगेड ने निवेदनाच्या माध्यमातून केलेल्या आहे.

यावेळी श्रीराम बिजोरे, आतिश वटाणे, आकाश रुडे, अनिल हरणे, उल्हास शेळके, अजय कदम, श्रीनिवास नरवाडे, दत्ता वऱ्हाडे , गजानन गायकवाड, शिवप्रसाद तंगडवाड, मुक्तार शाह (उपाध्यक्ष, एमपीजे), मोहम्मद अली, सिराज खान, अंबादास गव्हाळे, शेख जावेद,बालाजी तिवरंगकर, मोहनीश बंडेवार, नागराज दिवेकर, निकेश गाडगे, कृष्णा जाधव, राजु गायकवाड, अथर खतीब,गजानन दामोधर , मुसब्बीर अली, ताहेर शाह, अजय कदम, जरीफ खान, तुकाराम पवार, दत्ता दिवेकर , नदीम खान शेतकरी तथा पुरोगामी युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते. मूलभूत अधिकार संघर्ष समिती आणि एम पी जे या संघटनानी पाठिंबा दिला. ‘त्या’ इंजिनीअर वर कारवाई करा..!

“पैनगंगा नदीला आलेला पुराला ईसापुर धरण प्रशासनच जबाबदार आहे. त्यांच्या हलगर्जी पणामुळेच नदीकाठावरील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली आली.मा. मुख्यमंत्री साहेबांनी संबंधित इंजिनिअर वर कारवाई करून यवतमाळ जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करावे.तसेच शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत द्यावी. आता शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत या सरकार ने बघु नये”- शाहरुख पठाण प्रवक्ता, पुरोगामी युवा ब्रिगेड