ई – पीक पाहणीबाबात शेतकऱ्यांना मार्गदर्शन

27

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.8ऑक्टोबर):-ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे यवतमाळ येथिल विद्यार्थी आदित्य तांदूळकर याने नवेगाव (पेठ) येथील शेतवार जावुन ई पिक पाहणी अॅपबद्दल शेतकऱ्यांना मोबाईल वरून प्रात्यक्षिक करून दाखविले . मोबाईल हाताळणी करुन पिक नोंदणी याबद्दल माहिती दिली.

यावेळी ई पिक अॅप शेतातील पिक नोंदणी करुन पिक कर्ज , प्रत्यक्ष अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान , शेतातील पिकासंदर्भात सर्वच नोंदी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना घेता येते , मीच माझ्या पिकाची नोंद घेवु शकतो , अशा प्रकारची माहिती दिली . यावेळी गावातील शेतकऱ्यांची बैठक घेऊन सर्व शेतकऱ्यांना ई पिक अॅपबद्दल मार्गदर्शन केले . कार्यक्रम व प्रात्यक्षिक या करीता कृषीमहाविद्यालयाचे प्राचार्य आर. ए. ठाकरे , उपप्राचार्य मंगेश कडू , कार्यक्रम अधिकारी शुभम सरप यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले .