मुले कशी घडतात!

29

काय ते लहानपणचे दिवस असायचे आणि सोबतच आजीने सांगितलेल्या गोष्टी. ते मग अगदी ससा आणि कासवाच्या शर्यतीपासुन तर शिवाजीमहाराजांच्या शौर्य गाथा पर्यंत. एवढेच नाही तर आजीने शिकवलेले अभंग आजही लक्षात आहेत.
पण आज आजीच्या गोष्टी कुठे आहेत? मला तरी वाटते आज आजीची जागा मोबाईल, गोष्टींची जागा सिनेमाने आणि अभंगाची जागा गाण्यांनी घेतली. आधी मुलगा रडला की कुठल्यातरी शुर योध्याची शूरगाथा सांगितली जायची परंतु आता त्याच्याकडे मोबाईल देऊन देतात, मुले पण खुष आणि आईवडील पण. परंतु कुणी कधी विचार केला का? की या छोट्याश्या गोष्टीमुळे त्या मुलाच्या शैक्षणिक जीवनात काय बदल घडते ते?….

हे सर्व समजण्याआधी आपल्याला आपला मेंदु कसा काम करतो हे शिकाव लागेल. जेव्हा कधी आपण एखादा आवडणारा काम करत असतो तेव्हा आपला मेंदु जास्त प्रमाणात डोपामीन सोडत असतो आणि त्यामुळे तो काम पुन्हा पुन्हा करावासा वाटतो, परंतु त्यानंतर जे काम आपल्याला आवडत नाही ते काम आपण करू शकत नाही कारण आपला मेंदु कमी प्रमाणात डोपामीन सोडतो आणि तो काम करण्याची ईच्छाच राहत नाही. आता डोपामीन आणि शैक्षणिक जीवनाचा काय संबंध…तर खूप मोठा संबंध आहे, जेव्हा लहान मुलांच्या हातात मोबाईल येतो तेव्हा ते कार्टून, गाणी हे सर्व आनंद देणारे बघत असतात आणि त्यामुळे त्यांचा मेंदु जास्त प्रमाणात डोपामीन सोडतो परंतु यामुळे मुलांची पुस्तके वाचण्याची इच्छा नाहीशी व्हायला लागते आणि मूलं आणि पुस्तके यांची मैत्री जुडायच्या अगोदरच तुटुन जाते.

मग तुम्हाला प्रश्न येईल की आज तर पूर्ण जगच ऑनलाईन आहे आणि त्यात ऑनलाईन शिक्षण मग मुलांना मोबाईल पासून दुर ठेवुन कसे चालणार ? त्याकरिता मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याची गरज नाही फक्त त्यांना पुस्तकाच्या जवळ आना. त्यांना पुस्तकात आवड येईल अश्या प्रकारे त्यांना घरी शिकवा, त्यांच्या सोबत कविता म्हणा, छोटे छोटे कथा त्यांच्या सोबत वाचा, रात्र झोपतावेडेस पाढे पाठांतर करून घ्या, मुलांसोबत अभ्यासाचे खेळ खेळा अश्या प्रकारे मुलांना शिकवले की हळू हळू मुलांना शिकण्यात आनंद येईल.

हे तर लहान मुलांसाठी मग आजच्या तरुण पिढीच काय. जे तरुण ज्यांच्या हातात देशाची धुरा असायला पाहिजे त्यांच्या हातात पब्जी सारख्या गेम ची बंदूक आहे आणि वरून फेसबुक, व्हाट्सअँप यांची भर. ज्या सोसियल मीडिया प्लॅटफॉर्म चा उपयोग चांगल्या कामासाठी व्हायचं होत तिथे काही तरी दुसरेचं सुरू आहे. यात मुलांची तर चुकी आहेच सोबतच आईवडिलांची पण चुकी आहे कारण आईवडील मुलांच्या हातात मोबाइल तर देतात परंतु खरच मुलगा मोबाईल चा चांगला वापर करतो की वाईट यावर त्यांचा मुळात लक्ष नसतो.

मग या साठी काय करावे? सर्वात आधी प्रत्येक आईवडिलांनी मुलांमध्ये त्याच्या ध्येयाप्रती प्रेम निर्माण करून दिला पाहिजे जेणेकरून मोबाईलप्रती प्रेम कमी होऊन जाहिल. आता ध्येयाप्रती प्रेम कसा निर्माण करावा ? जेव्हा आईवडिल नेहमी मुलांसोबत त्यांच्या ध्येयाबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या दैनिक कामाबद्दल , आणि भविष्यात काय करणार याबद्दल चर्चा करतील संवाद करतील तेव्हा हळु हळु मुलांमध्ये जबाबदारीपणा निर्माण व्हायला लागतो आणि खर तर मोबाईलप्रती प्रेमही कमी होऊन आईवडिलांप्रती प्रेम वाढायला लागतो आणि एकदा का आईवडिलांप्रती प्रेम वाढला की मुल कधीच भरकडत नाही आणि नेहमी योग्य दिशेनेच वाटचाल करतात.

✒️लेखक:-राज कविता वसंत कोहळे(गडचिरोली)मो:-99238 15724