अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे ड्रोन द्वारे पंचनामे व्हावे पालक मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचना

24

✒️नाशिक प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.9ऑक्टोबर):-सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामा करणे आवश्यक असून पंचनामे करताना एकही बाधित शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पंचनामे करण्याचे नियोजन प्रशासनाने करावे अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालक मंत्री छगन भुजबळ बोलत होते.

या बैठकीस कृषिमंत्री दादाजी विषयी हे दूर दृश्य प्रणालीद्वारे तर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आमदार नरेंद्र दराडे डॉक्टर राहुल आहे देवयानी फरांदे सीमा हिरे सरोज आहिरे सुहास कांदे हिरामण खोसकर नितीन पवार जिल्हाधिकारी सुरज मांढरे पोलीस आयुक्त दीपक पांडेय महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे आदी बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते