ना. डॉ. भारती पवार यांचे हस्ते ऑक्सिजन PSA प्लॅन्टचे नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालय व निफाड ग्रामीण लोकार्पण सोहळा संपन्न

✒️नासिक प्रतिनिधी(विजय केदारे)

नाशिक(दि.9ऑक्टोबर):-सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा रुग्णालय नाशिक आयोजित भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत देशभरातील विविध ठिकाणी ऑक्सिजन प्लॅन्टचा लोकार्पण सोहळा भारताचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय निफाड व नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लँटचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना.डॉ.भारती पवार यांचे हस्ते करण्यात आले. मोदींजींच्या नेतृत्वाखाली भारत देश हा अन्य सर्वच क्षेत्रातील प्रगती बरोबरच आरोग्य क्षेत्रातही भरीव कामगिरी करत आहे. आरोग्याच्या अनेक सुविधा सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यासाठी भविष्यातील कोविड-19 तथा अन्य आरोग्याच्या येणाऱ्या संभाव्य रोगराईचा सामना करण्यासाठी भारत देश सक्षमतेकडे वाटचाल करत असल्याचे ना.डॉ.भारती पवार यांनी या प्रसंगी सांगितले.

आयोजित कार्यक्रमाप्रसंगी नाशिकचे महापौर सतीश नाना कुलकर्णी, आ.देवयानी फरांदे, आ.सीमाताई हिरे, डॉ.राहुल आहेर, भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, डॉ.श्रीवास, सहाय्यक खाजगी सचिव ओमप्रकाश शेटे, डॉ निखिल सैंदाने, स्वाती भामरे, जगन अण्णा कुटे, गणेश कांबळे आदी उपस्थित होते. रुग्णांसाठी आता नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात तसेच निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन PSA प्लँटची उभारणी करण्यात आली असून भविष्यातील संकट बघता हे ऑक्सिजन प्लँट रुग्णांसाठी वरदान ठरतील असे ना.डॉ.भारती पवार यांनी निफाड येथील ऑक्सिजन प्लँटच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सांगितले.

निफाड येथील लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर भाजपा जिल्हाध्यक्ष केदा नाना आहेर आमदार दिलीप बनकर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात राजाभाऊ ढोकळे प्रांत अर्चना पठारे तहसीलदार घोरपडे डॉक्टर राठोड महिला भाजप जिल्हाध्यक्ष सुवर्णा ताई जगताप निफाड तालुका भाजप अध्यक्ष भागवत बाबा बोरस्ते ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ बापू पाटील संपत नागरे सारिका ताई डेरले संजय वाबळे वैकुंठ पाटील जगन आप्पा कुटे लक्ष्मण निकम शंकर पिठे विलास मत्सगर संजय गाजरे आदेश सानप रवी सानप संजय धारराव तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसह मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED