माण तालुक्यातील सर्व ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र द्या : किरण खरात

29

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

🔸ची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र द्या : किरण खरात

म्हसवड(दि.9ऑक्टोबर):-महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाअंतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ चे माध्यमातून विविध कल्याणकारी योजना ऊसतोड कामगार व त्यांचे कुटुंबीय यांचे पर्यंत पोहोचविणेसाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. ग्रामसेवकांमार्फत सदर अर्ज स्वीकारून पडताळणी करून त ऊसतोड कामगारांची नोंदणी केली जाणार आहे.

ऊसतोड कामगारांचे व पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचे जीवन अत्यंत अस्थिर व हलाखीचे असलेने ऊसतोड कामगारांना त्यांची नोंदणी करून मिळणारे ओळखपत्र हे नक्कीच कामगारांसाठी महामंडळाच्या योजना विमा तसेच विविध शासकीय योजनेचा लाभ घेणेसाठी संजीवनी ठरणार आहे.

माण तालुक्यातील बहुतांशी लोक हे ऊसतोड कामगार म्हणून पश्चिम महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये काम करत असतात गेली अनेक वर्ष ऊसतोड मजुरी हाच प्रमुख व्यवसाय असलेने या सर्व ऊसतोड मजुरांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करून त्यांना शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर ओळखपत्र बहाल करणेत यावे अशी विनंती निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी माण तालुका गटविकास अधिकारी श्री. पाटील यांचेकडे केली आहे.यावर पंचायत समिती चे ग्रामपंचायत विभागास या ऊसतोड कामगार नोंदणी चे अनुषंगाने निर्देश देणार असलेचे गट विकास अधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले आहे