दैनिक झुंजारनेताच्या ‘उपसंपादक’पदी निवड ही उत्तम बोडखे यांच्या लेखणीचा सन्मान!

31

🔹आष्टीतील निवासस्थानी संपादक अजितदादा वरपे यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

बीड(दि.10ऑक्टोबर):- जिल्ह्याचा बुलंद आवाज आणि मराठवाड्याचा आत्मा असलेल्या दैनिक झुंजारनेता या वृत्तपत्र समूहाच्या सन्माननीय उपसंपादक पदी अआष्टी येथील वरिष्ठ पत्रकार माननीय उत्तमराव बोडखे यांची नियुक्ती आज मुख्यसंपादक अजितदादा वरपेसाहेब यांनी निवासस्थानी येऊन सन्मानाने केली.हा लेखणीचा सन्मान या न्यायाने बीड जिल्ह्यातील वाड्:मय अभ्यासक,लेखक प्रा.बिभिषण चाटे यांनी घेतलेला संक्षिप्त आढावा यानिमित्ताने देत आहोत.

समता,बंधुत्व,ऐक्य आदीसह सर्वधर्मसमभावाची शिकवण देणाऱ्या आधुनिक काळातील पत्रपंडीत स्व.मोतीरामजी वरपे (दादा) यांच्या बुद्धिकौशल्यातून दैनिक झुंजारनेताच्या रोपट्याला वटवृक्षात रूपांतरित करायला बीड जिल्ह्यातील मातीतील गोरगरीब दीनदलित दुबळ्या,अनाथ,अपंग,शेतकरी शेतमजूर वंचित घटकांसह समाजधुरीण, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचा,लाखो वाचक जणांचे आशीर्वाद आहेत! गोरगरिबांना न्याय देताना आणि अन्यायाला वाचा फोडताना दैनिक झुंजारनेताची लेखणी कधीच मागे हटली नाही.असे या दमदार मजबूत आणि कर्तव्यकठोर,निपक्षपाती,लेखणीची लोकप्रियता जिल्ह्यात मराठवाड्यात नोंद घेण्यासारखे आहे अशा या लोकप्रिय दैनिक झुंजारनेताच्या उपसंपादकपदी नुकतीच नियुक्ती दैनिक झुंजारनेताचे मुख्यसंपादक अजितदादा वरपेसाहेब यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानाने नियुक्ती देण्यात आली आहे.

एखाद्या समूहाला किंवा एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस प्रचंड यश प्राप्त होते तेव्हा त्याच्या पाठीमागचा इतिहास हा प्रचंड खडतर परिश्रमाने व्यापून निघालेला असतो.अगदी याच न्यायाने दैनिक झुंजारनेताने गेल्या कित्येक दशके बीड जिल्ह्याच्या मातीसह मराठवाड्याच्या या पवित्र भूमीला आणखी पवित्र करण्यात खारीचा वाटा उचलला. यामध्ये बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील अखंड प्रदीर्घ कठोर आशा अत्यंत मेहनतीने ज्यांनी ३६ वर्ष ज्या निष्ठेने काम केले त्यांना न्याय देत दैनिक झुंजारनेताचे मुख्यसंपादक अजितदादा वरपे साहेबांनी म्हणूनच एक गुणी,अभ्यासु आणि वरिष्ठ पत्रकार ठरलेल्या उत्तम बोडखे यांच्या लेखणीचा सन्मान त्यांना आष्टी येथील निवासस्थानी सन्मानाने पत्र देऊन त्यांचा गौरव केला आहे.गेली चार-पाच दशके बीड जिल्ह्याची माती राजकारणातील सुगंधी यशाने नाहुन निघाली होती.

महाराष्ट्राचा राजकीय इतिहास बीड जिल्ह्याच्या कर्तव्य कठोर राजकारणाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि अशा या सौंदर्याभिमुख राजकीय इतिहासाला योग्य झालर देण्यात झुंजारनेताचा नक्की वाट आहे. जेव्हा जेव्हा निवडणूक लागते तेव्हा तेव्हा दैनिक झुंजारनेता न्यायाधीशाची भूमिका बजावत राहतो.सर्वसामान्य वाचक वर्ग एका आशेने पहाटेपासूनच झुंजारनेताच्या बॅनर आणि प्रत्येक बातमीला टक लावून पाहतो हेच वाचकांची विश्वासार्हता आणि प्रेम झुंजारनेताची आजपर्यंतची कमाई आहे.

बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील आनंदवाडी या छोट्या खेड्यामध्ये उत्तमराव बोडखे प्राथमिक,माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन लहानाचे मोठे होत असताना छत्रपती शिवाजी महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले या महान मूर्तीच्या कार्याला नतमस्तक होत आणि त्यांचे कार्यपुस्तक रुपी समीप ठेवून त्यांनी वेगळी वाटचाल करायला सुरुवात केली.ओघानेच महाविद्यालयीन शिक्षणानंतर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेमध्ये उत्तमरावानी एव्हाना प्रवेश केला.मोतीरामजी वरपे दादांच्या मार्गदर्शनाखाली छत्तीस वर्षांपूर्वी केलेला प्रवास आज फलदायी ठरला आहे. दैनिक झुंजार नेता वृत्तपत्र समूहाने त्यांची आज केलेली माननीय उपसंपादक पदी नियुक्ती हा त्यांच्या आजपर्यंतच्या लेखणीचा… प्रचंड मेहनतीचा.. सन्मान आहे.!

झाले बहु, होतील बहु,या समाहा…
———————————————-
दैनिक झुंजारनेताने आपले वेगळेपण जपले.देश,राष्ट्र,राज्य,जिल्हा यासह बीड जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून आणि बीड जिल्ह्याचा आत्मा म्हणून नावलौकिक मिळवला.बीड जिल्ह्याचा बुलंद आवाज महाराष्ट्राचे पोलादी पुरुष आणि हिंदुस्तानचे माजी स्व.केंद्रीय ग्रामविकास मंत्री लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांच्या प्रचंड कार्याला व्यक्त करण्यात दैनिक झुंजारनेताची भूमिका महत्वपूर्ण राहिली.अनेक नेते मोठे करण्यामध्ये झुंजारनेताचा सिंहाचा वाटा आहे;किंबहुना अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यामध्ये आणि चुकत असेल तर त्यांच्यावर असुड ओढण्यामध्ये झुंजारनेता नेहमीच अग्रेसर राहिला…नूतन उपसंपादक उत्तमराव बोडखे यांना गेल्या ३६ वर्षांमध्ये अनेक अडचणी प्रश्न आणि समस्यांना तोंड द्यावे लागले. राजकारण,समाजकारण धर्म संस्कृती शिक्षण आदीसह विविध समस्यांना न्याय देताना ते रात्रंदिवस ग्रामीण भागांमध्ये बातमीसाठी फिरले,धडपडले.. रात्रंदिवस अहोरात्र गुणवंतांना न्याय आणि अन्यायाला वाचा फोडताना त्यांनी सदैव ऊन वारा वादळे अंगावर झेलली…दैनिक झुंजारनेताच्या उपसंपादकपदी मुख्यसंपादक अजितदादा वरपे साहेब यांनी केलेली नियुक्ती भविष्यातील समाजव्यवस्थेला योग्य न्याय देणारे ठरावी या अपेक्षा सह पुनश्च खूप खूप अभिनंदन!
———————————————-
नेता घडविणारा झुंजार ‘नेता…!!!

लोकशाहीमध्ये संयमी,शांत,उदात्त नेतृत्वाची समाजव्यवस्थेला नितांत गरज असते.मराठवाड्याच्या आणि बीड जिल्ह्याच्या या मातीतून कर्तव्यदक्ष नेते घडविण्यामध्ये दैनिक झुंजारनेताची भूमिका महत्त्वाची राहिली.अनेक निवडणुकांमध्ये वरिष्ठ पत्रकार उत्तम बोडखे यांच्या बातम्या जशास तशा खरे ठरल्या आहेत.उत्तमराव म्हणजे एक परखड व्यक्तिमत्त्व आहे,एकंदरीत वारीमुळे अंतःकरणाचे परिवर्तन होते.ज्ञान ही शक्ती आहे, तसे झुंजारनेता ही नेता घडवणारी ‘कार्यशाळा’ आहे.हे वाचकांचे मत आहे!!
-प्रा.बिभिषण चाटे