पिकांवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयावर कार्यशाळा

34

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.11ऑक्टोबर):-मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या मदतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत फवारणी करतानी विषबाधा होऊ नये यासाठी कशी काळजी या विषयावर नवेगाव्(पेठ) येथे कार्यशाळा घेणात आली. विदयार्थी आदित्य तांदूळकर याने शेतकऱ्यांना सुरक्षा किटचे महत्त्व समजावून दिले.

मागील काही वर्ष पासून खूप शेतकऱ्यांना विषबाधा झाली आणि मृत्यू सुद्धा झालेत. विषबाधा होऊ नये याकरिता काय काळजी घ्यावी व त्यावर काय उपाय केले पाहिजे हे समजावून सांगितले . या कार्यक्रमात प्राचार्य आर ए . ठाकरें , उपप्राचार्य एम व्ही कडू , कार्यक्रम अधिकारी , शुभम सरप , प्राध्यापक के . टी ठाकरे , प्राध्यापक पि . एन बोबडे प्रध्यापिका वानखेडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले .