झोतवाडे माध्यमिक विद्यालयात स्काऊट गाईड विषयी मार्गदर्शन

30

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)

दोंडाईचा(दि.13ऑक्टोबर):- शिंदखेडा तालुक्यातील झोटवाडे आज समता माध्यमिक विद्यालय झोतवाडे येथे स्काऊट आणि गाईड या विषयाचे उद्बोधन वर्ग घेण्यात आला आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात राज्य पातळीवरील स्काऊट गाईड ट्रेनर श्री नरेश सावंत सर यांनी राष्ट्रभक्ती चारित्र्यशील नागरिक, स्वलंबनी युवक घडवण्याचं महत्त्वपूर्ण माध्यम आहे.

भविष्यात शैक्षणिक क्षेत्रात व मिल्ट्री पोलीस एन सी सी विभागात करियर करिअर घडवू शकतो असे आपल्या अभ्यासपूर्ण मनोगतात सांगितले सरांनी अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक मा. पी एन पाटील सर यांनी केले.

अध्यक्षीय मनोगत मुख्याध्यापक श्री पी आर माळके सर यांनी व्यक्त केले आभार ज्येष्ठ शिक्षक महेंद्र आबा पाटील सर यांनी मांडले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री प्रवीण भदाने सर, गिरासे सर, कड्रे सर, नरेंद्र भामरे सर, एस एन पाटील सर ,संदीप पाटील सर शिक्षिका भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.