दीक्षाभूमी साकारून केले तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

23

🔸स्वतः च्या मुलाची कौतुकपद कामगिरी बद्दल आई वडिलांच्या मनात हर्ष मावेना…!

✒️सिध्दार्थ दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:-9823995466

उमरखेड दि.14ऑक्टोबर):-तालुक्यातील कारखेड एका गरीब कुटुंबातील या छोट्याशा गावांमधील असलेले एक उमदे कलाकार पेंटर गजानन भाऊराव काळबांडे यांचा मुलगा जय गजानन काळबांडे ह्याने दीक्षा भूमी साकारून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन…!जय ने खूप कमी वयामध्ये तो मोबाईलच्या युट्युब वर बघून चित्र साकारण्याचा प्रयत्न करतो आणि ते चित्र हुबेहूब चित्र साकारतो त्यानुसार त्यामध्ये रंग भरतो.

त्यासोबतच युट्युब वर बघून नवीन काहीतरी वेगळे करण्याचा तो प्रयत्न करत असतो.आज तो टाकाऊ पुठ्या पासून वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू तयार करत असतो.त्यामध्ये त्यांनी कार्ड शीट, पुठे यांच्यापासून फोटो फ्रेम ,घर ,कार, स्नायपर गन, चिडियाघर, मायक्रोस्कोप ,रोबोट, सायन्स गॉगल ,कबड्,जीप, रणगाडा, केटीएम बाइक, रेस कार ,बस, असे अनेक साहित्य त्यांनी बनवले आहे.

विशेष म्हणजे सर्व हुबेहूब असे बनवले आहेत त्यामध्येच नव्याने कौतुक करावे तेवढे कमीच आहे असे त्यांनी त्यामध्ये विशेष म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी ज्या ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ते ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी असून त्याची प्रतिकृती त्यांनी ते टाकाऊ पुठ्या पासून जय काळबांडे यांनी हुबेहूब दीक्षाभूमी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

अगदी सुंदर आणि हुबेहूब अशी दीक्षाभूमी त्यांनी साकारली आहे आणि त्याप्रमाणे त्याला कलर दिला आहे त्यांचे सर्व समाजातील बांधव जय यांच्या कौतुक करत आहे व तसेच महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय इयत्ता पाचवीचा विद्यार्थी असून त्यांनी शाळेमध्ये पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त जय काळबांडे यांनी चित्र साकारले होते.

तर त्याचा महात्मा फुले विद्यालय चे मुख्याध्यापक श्री देशमुख सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहे.
मुलाची ही कौतुकपद कामगिरी बद्दल आई वडिलांच्या मनात हर्ष मावेना…!