राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना…..

29

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.16ऑक्टोबर):-आज विजयादशमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापनादिन  संघाच्या कोल्हापूर शाखेमार्फत आज सकाळी ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले . त्यानंतर महाराजांना घोषावर ( संघाचा बँड )”राजर्षी शाहू ” हया नवीन रचनेचे वादन करून मानवंदना देण्यात आली.

सर्वप्रथम मानवंदना चे वादन झाल्यानंतर स्वयंसेवकांनी गणवेशात महाराजांसमोर शिस्तबद्ध व तालबद्धपणे आनक , शृंग , वंशी , शंख ,पणव , त्रिभुज ,झल्लरी या वाद्यांचे सांघिक व स्थिर वादन केले.

श्रीराम , तिलंग ,चेतक, श्रीपाद, केदार ,तिलककामोद, यासह विविध घोषरचनांचे यावेळी वादन करण्यात आले.
यावेळी संघाचे पदाधिकारी ,स्वयंसेवक , व नागरिक उपस्थित होते.

नागरिकांकडून स्वागत….

प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी यावेळी स्वागत केले.