भूमिहीन शेतकऱ्यांना हक्काचे जमीनपट्टे द्या-सुदामभाऊ राठोड यांची मागणी

52

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.17ऑक्टोबर):- मानीकगड पहाडावरील अतिदुर्गम आदिवासी जिवती तालुक्यात नांदेड, लातुर, उस्मानाबाद, परभणी, कर्नाटक राज्यातून इतर ठिकाणांहून शेतकरी १९५० ते १९५५ ला आले असून उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलतोड करून शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत आहे तरी आतापर्यंत या क्षेत्रातील भूमिहीन शेतकऱ्यांना जमीनेचेपट्टे मिळालेले नाही ,म्हणून या शेतकऱ्यांना शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेता येत नाही,कारण प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीनेचेपट्टे अनिवार्य आहे.

जसे एखाद्या शेतकऱ्यांला व्यवसाय करायचे झाल्यास कर्ज घेण्यासाठी बँक मध्ये कर्जासाठी अर्ज केला तर तो अर्ज नामंजुर करतात शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकर्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती शिवाय दुसरा पर्याय नाही तालुक्यातील भुमिहीन शेतकऱ्यांना शेतीचे पट्टे देण्यात यावे असे सुदामभाऊ राठोड चंद्रपूर जिल्हा प्रभारी जय विदर्भ पार्टी यांनी मा. ना.विजयभाऊ वडेट्टीवार मंत्री,इतर मागास, बहुजन कल्याण विभाग,खार जमीन विकास, आपत्ती व्यवस्थापन,व पुनर्वसन(म.रा.)तथा पालकमंत्री चंद्रपूर महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देऊन मागणी केली.

यावेळी उपस्थित सुदामभाऊ राठोड चंद्रपूर जिल्हा प्रभारी जय विदर्भ पार्टी),विशाल राठोड सोशल मीडिया अध्यक्ष चंद्रपूर, निखिल डांगे, विनोद पवार (जिवती शहर प्रमुख),सारिका नंदेवार,सचिन मेश्राम, लक्ष्मण खुटेकर, सुरज राठोड,मारोती रिंगत, विजय चव्हाण, संतोष राठोड,रामेश्वर चव्हाण व जय विदर्भ पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.भूमिहीन शेतकऱ्यांची मागणी पूर्ण न झाल्यास जय विदर्भ पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला