आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे ममदापुर ते झोलंबा रस्त्याचे काम पूर्णत्वास जाणार !

34

🔹आ. देवेंद्र भुयार यांनी उपलब्ध करून दिला 2 कोटी 33 लक्ष रुपयांचा निधी !

🔸शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा संपन्न !

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.18ऑक्टोबर):-शासनाच्या योजना गावांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतांना गावातील गरजा आणि ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या ध्यानात घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न असून ग्रामविकासाला चालना देण्यासाठी वरुड मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात सर्वदूर रस्त्यांचे जाळे उभारण्यात येईल असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुड तालुक्यातील ग्राम ममदापुर ते झोलंबा रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करण्यासाठी “मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत 2 कोटी 33 लक्ष रुपये निधीची तरतुद करुन दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्राम ममदापुर ते झोलंबा रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करण्यासाठी रस्त्याचा भूमिपूजन सोहळा माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नाने ममदापुर ते झोलंबा रस्त्याचे दर्जोन्नतीकरनाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर करून 2 कोटी 33 लक्ष रुपये निधीची तरतुद करून दिल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.

यावेळी भूमिपूजन सोहळ्याला माजी कृषी मंत्री तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, माजी सभापती राजाभाऊ कुकडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, माजी सभापती कमलाकर पावडे, सुभाष पावडे, सरपंच सौ.अपर्णाताई आखरे, उपसरपंच अमोल बडोदे, ग्राम पंचायत सदस्य निस्वादे, चंदाताई फुले, मंदाताई इडपाची, बंडु शेळके, निरंजन बोहरा, राजु युवनाते, भगवान दंडाळे, अनिल शेळके, नारायण बद्रे, प्रशांत फुले, गजानन दंडाळे, बाळु टेकाम, अमोल बद्रे, नामदेव कोळमकर, प्रभाकर इंगोले, पांडूरंग इंगळे, जयदेव कोळमकर, पंकज फुले, अरुणराव बरवट, नरेश काळे, गणेशराव वरवट, ओंकार धुतकवरे, तुषार इंगळे, सविताताई निस्वादे, गीताताई बद्रे, सुकेशनीताई गजबिये, सविताताई नेहारे, वनिताताई दंडाळे,तसेच ग्राम झोलंबा आणि ममदापूर येथील ग्रा. पं. सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.