नेहरू युवा केंद्र आणि नगरपंचायत चामोर्शी च्या वतीने ‘स्वच्छता व वृक्षारोपण’ अभियानास सुरुवात

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.18ऑक्टोबर):-भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येणारा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नेहरू युवा केंद्र व नगर पंचायत चामोर्शी च्या वतीने संयुक्त रित्या स्वच्छता व वृक्षारोपण अभियानाचा शिकतोडे तहसीलदार चामोर्शी यांच्या हस्ते शिवाजी महाविद्यालय,चामोर्शी येथे उद्घाटन करन्यात आला.

येणाऱ्या काळात मानवाला उत्तम व निरोगी जीवन जगायचे असल्यास व सोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्याकरिता स्वच्छता व वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असून कचऱ्याचे योग्य व्यवस्थापनही तितकेच महत्वाचे आहे व यासाठी युवकांनी पुढे येऊन आपल्या शिक्षणाचा आधार घेत या उपक्रमाला हातभार लावावा असे प्रतिपादन शिकतोडे यांनी यावेळी केले.

इथून पुढे चामोर्शी परिसरातील विविध महाविद्यालयात वृक्षारोपण, स्वच्छता व जनजागृती व यासारखे अन्य उपक्रम नेहरू युवा केंद्र व नगर पंचायत च्या वतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती नगर पंचायत चे नोडल अधिकारी बनसोड यांनी दिली. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून चामोर्शी चे तहसीलदार शिकतोडे, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे मुख्याध्यापक किरमे, प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत चे नोडल अधिकारी बन्सोड, तांत्रिक सहाय्यक कोडवते, प्रा.आकेवार, श्रीमती शिकतोडे उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रास्ताविक लुकेश सोमनकर, सूत्रसंचालन अनुप कोहळे व आभार कल्याणी गायकवाड यांनी मानले.