पैगंबर जयंती निमीत्त रक्तदान शिबीर संपन्न

31

🔸युथविंग ,जमाअत इस्लामी चा उपक्रम

🔹भरभरून प्रतिसाद १३४ युनिट रक्त दान

✒️सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर(तालुका प्रतिनिधी,उमरखेड)मो:- 9823995466

उमरखेड(दि.18ऑक्टोबर):-शांतीदुत, मानवतेचे उध्दारक, दयेचेदुत, लोकशाहीची बिजे रोवणारे, ज्ञानाला सार्वत्रिक करणारे, महिला -गुलाम – पददलितांना त्यांचे हक्क बहाल करणारे एकमेव अल्लाह- इश्वराचे अंतिम प्रेषित- पैगंबर हजरत मुहम्मद सल्लम यांचे जयंती निमीत्त युथ विंग उमरखेड ने सामाजिक बांधिलकी राखत भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.

शिबीराचे आयोजन दिनांक १७ ऑक्टोबर रविवार ला आठवडी बाजार येथे आयोजित करण्यात आले होते.

सदर शिबिरास उमरखेड डॉक्टर असोशिएशन यांनी मोलाचे सहकार्य केले .उमरखेड शहराच्या नागरिकांनी आपला भरभरून सहभाग नोंदवित या शिबिरात एकूण १३४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

विशेष म्हणजे सर्वच जाती धर्माच्या नागरिकांनी स्वइच्छेने या सामाजीक कार्यात भाग घेवून रक्तदान केल .

या शिबिराचे उद्घाटन उमरखेड डॉक्टर असोशियशन चे डॉ विवेक पत्रे यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास प्रमुख पाहणे म्हणून ठाणेदार अमोल माळवे, डॉ आबीद खान, डॉ एस .पी.डोंगे, डॉ . मोहम्मद गौस, डॉ .एच.एस.धर्मकारे नगरसेवक रसूल पटेल, डॉ. जुनेद खान, डॉ. मुज्जामिल लाला, इरफान विराणी, शहारुख पठाण, काझी जहीरोद्दीन आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी युथ विंग चे अध्यक्ष मो . साबीर यांनी युग विंगही युवकांची संघटना असुन जनसेवेच्या कार्यात तत्पर असल्याचे सांगत कोरोनाकाळात गरीबांना आवश्यक वस्तुच्या किट वितरित केल्याचे तसेच गरीब, विधवा, रुग्ण, यांची मदतीचे उपक्रम राबवित असल्याचे सांगीतले . प्रास्तावीकात काजी जहीरोद्दीन यांनी तुमच्या मध्ये सर्वात श्रेष्ठती व्यक्ती आहे.

जी लोकांसाठी फायदेमंद आहे हे प्रेषित वचन मांडत निर्मिकाने सर्वांचा रक्त समान ठेवून ते इतर कोणत्याही जाती -धर्म – रंग – वंशाच्या लोकांना चालतो याव्दारे सर्व मानव समाज एक असून आपण माणुसकी जपण्याचे कार्य करावे असे सांगत , रक्तदानाचचे महत्व विषद केले . असेच उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासने गरजेचे आहे असे सांगत मागील वर्षी १०१ युनिट रक्तदान झाल्याची माहीती दिली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मो .साबिर मो . ताहेर (शाखा अध्यक्ष) यांनी केले.

कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्ते जिशान खान, आलम खान, इंजिनियर सोहेल शेख, आकीब अली, अजीम अली शेख खिज़र, शेख सरफराज, शाहीद खान, मुब्बशीर अली, फराज हुसेन, वजाहतखान, सैय्यद मुशीर, शेख शाहरूख यांनी परिश्रम घेतले.